जामखेड न्युज ——–
साकत घाटात उद्या महाबली हनुमंत रायांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा
आध्यात्मिक मान्यवरांची उपस्थिती
जामखेड साकत मार्गावर साकत घाटात श्री साकेश्वर गोशाळेजवळ उद्या महारूद्र महाबली हनुमंतरायांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा अध्यात्मिक मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यानिमित्त किर्तन सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
साकत घाटात महारूद्र महाबली हनुमंतरायांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या बुधवार दि. १४ रोजी मि. माघ. शु. ५!! शके १९४५ रोजी महंत ह. भ. प. त्रिविक्रमानंद शास्त्री (इंदुवासिनी गड पिंपळनेर) व
ह.भ.प. उत्तम महाराज वराट (साकत) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
बुधवार दि १४ रोजी सकाळी १० ते १२ ह. भ. प. त्रिविक्रमानंद शास्त्री यांचे किर्तन होईल तरी किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ह. भ. प. सतीश महाराज उरणकर (विठ्ठल रुक्मिणी संस्थान, पाटोदा) असणार आहेत.
या कीर्तनासाठी साथ म्हणून श्री संत ज्ञानेश्वर अध्यात्म संगीत विद्यालय वाघीरा फाटा येथील विद्यार्थी हजर राहणार आहेत. व किर्तनाला साथ देणार आहेत.
तरी साकत परिसरातील नागरिकांनी महारूद्र महाबली हनुमंतरायांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.