जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील १९५१ च्या आगोदर आष्टीत असणाऱ्या वीस गावांचे कुणबी रेकार्डच गहाळ
संचालक करण ढवळे यांचा पाठपुरावा, महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट
जामखेड तालुक्यातील २० गावांचे निजामशाही काळातील रेकॉर्ड हे आष्टी तालुक्यातील महसूल विभागात आहे. याबाबत मागणी करुनही हे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे या वीस गावातील लोकांच्या कुणबी नोंदीचा प्रश्न आजुन सुटला नाही. या प्रकरणी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक करण ढवळे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. या नंतर महसुल मंत्र्यांनी तातडीने या निवेदनाची दखल घेत आष्टी महसूल मध्ये असलेल्या या रेकॉर्ड बाबत तातडीने कार्यवाही करावी आसे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे लवकरच या वीस गावांचे रेकॉर्ड मिळणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जामखेड तालुक्यात आतापर्यंत सुमारे २६ हजार नोंदी सापडल्या आहेत. तसेच काही मोडी लिपीतील रेकार्ड चे स्कॅनिंग सुरू आहे. आणखी नोंदी मिळतील पण तालुक्यातील सुमारे वीस गावे आष्टी तालुक्यात होते. त्या ठिकाणचे रेकार्ड मिळत नाही. याबाबत तहसीलदार आष्टी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. या गावातील रेकार्ड साठी संचालक करण ढवळे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन रेकार्ड तपासण्या साठी सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. याच अनुषंगाने शासनाने कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती गठीत करुन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांचे ठीक ठिकाणी जुने रेकॉर्ड तपासणी करण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील आघी, कवडगाव, गिरवली, चोंडी, जवळके, जवळा, तरडगाव, धनेगाव, धोंडपारगाव, नायगाव, पिंपरखेड, फक्राबाद, हसनाबाद, हाळगाव, धानोरा, सावरगाव, मोहरी, सातेफळ, वाघा व दिघोळ या २० गावांचे सन १९५१ सालच्या पुर्वीचे रेकॉर्ड हे आष्टी तालुक्यातील महसूल विभागात आहे.
या बाबत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक करण ढवळे यांनी हे रेकॉर्ड मिळावे म्हणून २०२१ साली आष्टी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. यानंतर दि ७ डिसेंबर २०२३ रोजी देखील जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सन १९५१ पुर्वीचे जामखेड तालुक्यातील गावांचे निजामशाही च्या काळातील दप्तर स्कॅनिंग करीता मिळावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यावेळी आष्टी महसूल विभागाकडे फक्त दोन ते तीन गावांचे रेकॉर्ड मिळाले होते मात्र उर्वरित गावांचे रेकॉर्ड गेले कोठे हा प्रश्न सध्या या वीस गावातील मराठा बांधवांना पडला आहे.
आखेर संचालक करण ढवळे यांनी तातडीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदन देऊन या बाबत रेकॉर्ड मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने आष्टी महसूल विभागास तातडीने कार्यवाही करावी आसे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे लवकरच या वीस गावांचे रेकॉर्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चौकट
जामखेड तालुक्यातील वीस गावांचे रेकॉर्ड मिळण्यासाठी संचालक करण ढवळे यांनी आष्टी येथील महसूल विभागाकडे वेळोवेळी निवेदने दिली व पाठपुरावा केला होता. मात्र आष्टी महसूल विभागाकडून या गावांचे रेकॉर्ड आमचेकडे देखील नाही असे सांगण्यात येते मग या वीस गावांचे रेकॉर्ड गेले कोठे असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.