सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है घोषणांनी दुमदुमला परिसर थोड्याच वेळात रोहित पवार यांची चौकशी

0
370

जामखेड न्युज——

सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, 
घोषणांनी दुमदुमला परिसर

थोड्याच वेळात रोहित पवार यांची चौकशी

 

 

विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसत आहे. राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी आज रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्यांची चौकशी होणार आहे. ठिकठिकाणी रोहित पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत.

विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसत आहे. राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी आज रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्यांची चौकशी होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट मोठं शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत. ‘पळणार नाही तर लढणारा दादा ‘ असे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले आहेत.


पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे, तसेच मुंबई पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईडी कार्यालय तसेच राष्ट्रवादीचे कार्यालय दोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


रोहित पवारांच्या सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून पार्टी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तेथे कार्यकर्ते व शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती अमरावती जिल्हा अध्यक्ष शिवराज वाकोडे यांनी दिली.


रोहित पवार यांच्या समर्थनासाठी कर्जत जामखेड मतदार संघातून अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते राष्ट्रवादी भवना समोर जमले आहेत. डोक्यावर टोपी, गावठी पोशाख, घालून सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है अशा घोषणा ही दिल्या जात आहेत.

तसेच राष्ट्रवादी भवन समोर आसूड ओढत ईडीचा निषेधही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. सकाळ पासून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

रोहित पवार 11 च्या सुमारास ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. तर त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात येऊन थांबणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्या मध्ये मोठा उत्साह आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here