अँड डॉ.अरुण जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाही मित्र पुरस्कार, जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
860

जामखेड न्युज——

अँड डॉ.अरुण जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाही मित्र पुरस्कार, जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भटक्या विमुक्त अदिवासी समाजासाठी काम करणारे, वंचित निराधार लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारे तसेच अनाथ निराधार मुलांसाठी शाळा सुरू करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे अँड डॉ.अरुण जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाही मित्र पुरस्कार २०२४ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

भटके विमुक्त आदिवासी समाजातील समाजामध्ये काम करणाऱ्या संस्था -व्यक्ती यांना दिला जाणारा”उत्कृष्ट संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार 2024 “हा अहमदनगर जिल्ह्यातील अँड डॉ अरुण जाधव यांना जाहीर झाल्याची माहिती श्री मनोहर पारकर उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय क्र.संकीर्ण,2023/प्र.क्र 745/ निवडणूक,सामन्य प्रशासन विभाग मादम कामा रोड मंत्रालय मुंबई, 400032 दि.21जानेवारी 2024 रोजीच्या लेखी पत्राद्वारे दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाचे पत्राद्वारे दिली आहे.भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक 491/ईसीआय/एल ईटी/एफ युनसी/स्लिप.1/2023 दि 15 जानेवारी 2024 च्या संदर्भानुसार अँड डॉ अरुण जाधव यांना हा पुरस्कार मिळणार असुन या पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी आयोजन केले असल्याची महिती माहिती श्री राहुल पाटील साहेब उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरिकांच्या मतदार नोंदणीच्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2023-2024 या वर्षी भराच्या कालावधी मध्ये निवडणूक विषयां संदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरीच्या आधारे विशेष योगदान दिल्याने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन दिनांक 24 जानेवारी 2024 सकाळी रोजी 10 वाजता जयहिंद कॉलेज, चर्चगेट मुंबई येथे ” लोकशाही मित्र पुरस्कार 2024 “पुरस्कार वितरण होणार आहे.

अँड डॉ अरुण जाधव हे मागील 30 वर्षांपासून संस्थात्मक आणि संघटनात्मक पातळीवर भटके विमुक्त आदिवासी वंचित समुहाचा न्याय, हक्क, अधिकार, काम करीत आहे आहेत त्याचा सामजिक कार्याचा सन्मान वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना आणि महाराष्ट्र शासनाने यापूर्वी घेतला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने, “भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,सन २०११-१२ ” मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते औरंगाबाद येथे दिला होता, तसेच महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांनी १३ जानेवारी २०१८ रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट ,मुंबई साधना ट्रस्ट पुणे येथे “सामाजिक कार्य पुरस्कार ” या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्याचबरोबर मराठवाडा लोकविकास मंच यांनी २०२१ रोजी कार्यकर्ता गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच विक्रमशिला हिंन्दी विद्यापीठ भागलपूर, बिहार यांनी ’’समाजरत्न’’ हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीवजी सोनवणे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.


त्याचबरोबर भगवान महाविद्यालय ,आष्टी यांनी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘गंगाई बाबाजी, आदर्श समाजरत्न पुरस्काने जानेवारी २०२३ मध्ये गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या लोकशाही मित्र पुरस्कार २०२४ मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातुन अनेक सामाजिक क्षेत्रात तील व परदेशातील मित्रांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here