जामखेड न्युज——
श्री रेणुकामाता मल्टिस्टेट पैठणच्या वतीने भव्य कर्ज मेळावा, शेकडो खातेदार कर्ज मंजुरीसाठी पात्र
पैठण येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को बँक शाखा पैठण येथे सोमवार 08 जानेवारी 2024 रोजी भव्य कर्ज मेळावा आयोजित केला होता. या कर्ज मेळाव्याला पैठण येथील असंख्य नागरिकांनी भेट देऊन उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. या मेळाव्यात 108 खातेदारांना कर्ज मंजुरीसाठी पात्र केले गेले व त्यांना तात्काळ कर्ज मंजुरी दिली जाणार आहे. अशी माहिती श्री रेणुकामाता मल्टीस्टेट बँकेचे शाखाधिकारी प्रसाद कचरे पासिंग ऑफिसर अनिकेत पुरी यांनी दिली आहे. व या कर्ज सुविधेचा लाभ आणखीन नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.
बँका पतसंस्था यांच्या कडून कर्ज घेऊन आपण उद्योग, व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक उन्नती करू शकतो यामुळे श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को बँकेच्या कर्ज सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य याला कर्ज अथवा ऋण असे म्हणतात. कर्जाने रक्कम घेणाऱ्याला ऋणको अथवा कर्जदार म्हणतात. कर्जे देणाऱ्याला धनको, किंवा सावकार असे म्हणतात. आधुनिक काळात विविध बँका, पतपेढ्या, खासगी ऋणसंस्था, सरकारी संस्था यांच्यामार्फत कर्ज देण्याचे काम केले जाते.