जामखेड न्युज——
आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सभापती शरद कार्ले यांच्या तर्फे हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी जवळा जिल्हा परिषद गटातील मुलांना शालेय साहित्यांचे वाटप केले यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.
भाजपा नेते, माजीमंत्री आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व उद्योजक राजेंद्र देशपांडे यांच्या वतीने जवळा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे.
दि. १ जानेवारी रोजी आ. प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस संपुर्ण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मोठय़ा उत्साहात साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व उद्योगपती राजेंद्र देशपांडे यांच्या वतीने कुसडगाव, जवळा, हाळगाव, आरणगाव, डोणगाव, पिंपरखेड, रत्नापुर, पाटोदा, चौंडी, कवडगाव, आघी, धानोरा, धोंडपारगाव, राजेवाडी, झिक्री, डिसलेवाडी, बावी, सांगवी, खामगाव, भोयकरवाडी, फक्राबाद, डोणगाव, भवरवाडी व खांडवीसह जवळा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या शालेय साहित्य वाटप प्रसंगी विविध ठिकाणी विविध पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
चौकट
माजीमंत्री आ. राम शिंदे यांनी मतदारसंघातील शेती, विज, पाणी, रस्ते तसेच विविध विकासासाठी अनेक योजना व विकास कामे होत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्याच प्रेरणेने जवळा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना विशेष आनंद वाटत आहे. कारण शिक्षणामुळेच आपल्या जीवनात प्रगती होत असते. याच विचारातून हे शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे.
पै. शरद कार्ले.
सभापती : कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड