जामखेड न्युज——
खर्डा येथील भीषण अपघातात एक ठार एक जखमी,
मुंबई कळंब बसवर दगडफेक,
मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन
जामखेड तालुक्यातील खर्डा शहराजवळ एसटी बस व मोटारसायकल यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक ठार व एक जखमी झाला आहे. मोटारसायकल वरील सोनू अनिल काळे वय 25 वर्षे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मोटरसायकल चालवणारा संदीप लहू पवार हा गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेनंतर मुंबई- कळंब बसचे चालक अमोल अंकुश पांढरे यांनी मोटारसायकल चालक संदीप लहू पवार याच्या विरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला यानंतर मयतच्या नातेवाईकांनी पुणे कळंब बसवर दगडफेक केली तसेच मृतदेह रस्त्यावर ठेवून बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यानुसार खर्डा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. खर्डा पोलीसांनी ताबडतोब जामखेड वरून जादा पोलीस बंदोबस्त मागणी केली यानुसार बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत माहिती अशी की, दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी खर्डा शहराजवळ मुंबई- कळंब ही एसटी बस खर्डावरून जामखेड रस्त्याने जात असताना सिताराम गडावरून खर्डा गावाकडे टीव्हीएस ज्युपिटर कंपनीची एम एच १६ डी एफ 1912 या मोटरसायकलने एसटी बसला भरधाव वेगाने उजव्या बाजूला जोराची धडक दिल्याने या अपघातात सोनू अनिल काळे वय 25 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मोटरसायकल चालवणारा संदीप लहू पवार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे, या घटनेमुळे खर्डा शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
खर्डा किल्ला ते सिताराम बाबा गड या दुपदरी झालेल्या नवीन रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसावेत अशी मागणी शिवपट्टण युवा मंच व खर्डा ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत एसटी ड्रायव्हर अमोल अंकुश पांढरे कळंब डेपो राहणार ईटकुर तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी खर्डा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता खर्डा पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वी. कलम 304 (अ) 279 427 मो.वा. कलम 184 प्रमाणे संदीप लहू पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर मयतच्या नातेवाईकांनी खर्डा येथे आलेल्या पुणे कळंब बसवर दगडफेक केली तसेच मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन करत बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यानुसार खर्डा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. यानुसार बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी शेंडे हे करीत आहेत.