जामखेड न्युज——
कर्जत-जामखेडच्या महिला बचत गटांची लाखोंची उलाढाल,
महिला सक्षमीकरणासाठी भीमथडी जत्रा पॅटर्न ठरला यशस्वी,
कर्जत-जामखेडच्या महिलांना मिळालं हक्काचं व्यासपीठ
दरवर्षीप्रमाणेच यंदाही पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर १७ वर्षांची परंपरा अबाधित ठेवत भीमथडी जत्रेचे आयोजन सौ. सुनंदाताई पवार यांच्यामार्फत करण्यात आले होते. या भीमथडी जत्रेत आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील म्हणजेच कर्जत जामखेडमधील अनेक महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
ज्यातून महिलांना स्वयंस्फूर्त आणि सक्षम बनण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात महिलांनी भीमथडी जत्रेत सहभाग नोंदवत आपला स्टॉल लावून व्यवसाय केला आणि त्यातून लाखोंची उलाढाल केली. 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ही भीमथडी जत्रा पार पडली.
अशा पद्धतीने शहरी भागात ग्रामीण भागातून घेऊन महिलांनी व्यवसाय केल्याने त्यातून त्यांना व्यवसायाचे विविध अंग व पैलू माहिती होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील व देशातील विविध भागातून आलेल्या लोकांच्या ओळखी झाल्या आणि आत्मविश्वासही दृढ झाला.
कर्जत जामखेड मतदारसंघातील एकूण ६७ च्या आसपास स्टॉल्स भीमथडी जत्रेत लावण्यात आले होते. त्या माध्यमातून कर्जत जामखेडकर महिलांनी तब्बल 80 लाखांच्या आसपास उलाढाल जत्रेदरम्यान केली हे विशेष.
सौ. सुनंदाताई पवार यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी उचललेला विडा हा पूर्णत्वास जात असल्याचं या माध्यमातून स्पष्ट होत आहे. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील एकूण ६७ महिला बचत गटांचा भीमथडी जत्रेत सहभाग होता. तसेच या जत्रेत कर्जत-जामखेडच्या बचत गटांनी अवघ्या ५ दिवसात तब्बल ८० लाखांच्या आसपास उलाढाल केली आहे.
सर्वच महिला बचत गटांनी या जत्रेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आमदार रोहित पवारांचे आभार व्यक्त केले पण या सर्वांचं श्रेय हे माझ्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांचं असल्याचं रोहित पवार यांनी बोलून दाखवलं आहे. भीमथडी जत्रेत महिलांनी लावलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली त्यातच मांसाहारी जेवणावर ताव मारत अनेकांनी पुण्यात गावातील चव चाखायला मिळाल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं. तसेच व्यवसायाचा अनुभव नसलेल्या आणि व्यवसायात नवीन असलेल्या महिलांनाही अनेक चांगले वाईट अनुभव आले ज्याचा फायदा त्यांना पुढील वाटचालीसाठी नक्कीच होईल.