जामखेड न्युज——
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या अरूंद रस्ता, धिम्या गतीने काम, अपुरे काम यामुळे भीषण अपघातात तरूण व्यापाऱ्याचा मृत्यू
जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी अतिश भागवत पवार वय ३२ यास रात्री ९:३० वाजता बीड रोड वरील हॉटेल शिवराज समोर, क्रुझर क्र. MH24AW2558, धडक दिल्याने मोटारसायकल स्वार व्यापारी अतीश पवार, याचा जागीच मृत्यू झाला.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. काम खुपच धिम्या गतीने सुरू आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. तसेच बीड रोडवर काही काम झाले आहे यावरून वाहतूक सुरू आहे. पण दोन गाड्या बसत नाहीत. तसेच साईट पट्ट्या नीट भरल्या नाहीत. रस्त्यावर रात्रीच्या वेळी रेडिअम नाही तसेच कसलेही बोर्ड नाहीत. यामुळे वेगावर नियंत्रण मिळवता येत नाही. यामुळे अपघात होतात.
मागे पावणेदोन महिन्यांपूर्वी हायवा अंगावर गेल्याने एका युवक कामगाराचा जाग्यावर मृत्यू झाला होता. याच बरोबर गाडी घसरून पडल्याने अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेकांचे हातपाय मोडलेले आहेत. रात्री समोरासमोर धडक झाल्याने व्यापारी युवक आतीष भागवत पवार जाग्यावर मृत्यू झाला.
रात्री ९.३० च्या सुमारास मोटारसायकल व क्रुझर चा अपघात झाला घटनेची माहिती समजतात आकाश घागरे आणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी धावपळ केली परंतु घटनास्थळी मृत्यू झाल्याचे, रुग्णालयात दाखल केल्यावर समजले.
घटनेची माहिती अशी, जामखेड शहरात आणि लगत रोडचे काम चालू आहे एक साईडचे काम धीम्या गतीने चालू आहे, तसेच संबधित कामाचे कसलेही बोर्ड अथवा वेगाचे अडथळे निर्माण केलेले नसल्या कारनाने, चालकांना रात्री रस्त्याचा अंदाज येत नाही, प्रवास करणाऱ्या चार चाकी दोन चाकी वाहनांना खूप अडचण येते.
यामुळे बरेच अपघात होऊन बऱ्याच जणांचे प्राण गेले आहेत महत्त्वाचे म्हणजे आतिश पवार हा कामानिमित्त बीड रोडला टू व्हीलर जात असताना समोरील क्रुझर ने जोरात धडक दिल्याने तो उडून करुझर च्या बोनेटवर पडून पायाचे हाड मोडले. डोक्याला मार लागला होता. अशा परिस्थितीत त्याला तत्काळ रुग्णालयात आणले परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
यावेळी सुनील जगताप, राहुल घोरपडे, डॉक्टर प्रदीप कुडके, सनी सदाफुले, सचिन खामकर, मारुती काळजाते आदींनी मदत केली. त्याच्या मागे आई-वडील पत्नी असा परिवार आहे. मनमिळावू स्वभाव असलेला, तरुण व्यापारी अतिश पवार चे लग्न आत्ताच सहा महिन्यापूर्वी झाले होते. सदरच्या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली पाटील यांनी ताबडतोब आपले हवालदार पाठवून पंचनामा करून दिला