जामखेड न्युज——
सौताडा परिसरात बिबट्या ?
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
वीस दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यातील आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या दिसला होता. वनविभागाने तो सुरक्षित पणे जेरबंद केला होता. आता वीस दिवसांनंतर सौताडा परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
सोशल मीडियावर सौताडा परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ फिरत आहे पण व्हिडिओ कोणी काढला ही माहिती मिळू शकली नाही. परिसरातील नागरिकांशी संपर्क करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता काही लोकांच्या मते व्हिडिओ खरा आहे. तर काही लोक म्हणतात आम्हाला माहिती नाही.
सध्या मात्र सोशल मीडियावर बिबट्याचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण पाटोदा वनविभागाशी संपर्क होऊ शकला नाही.
खरोखर बिबट्या आहे किंवा नाही. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. काही दिवसांपूर्वी धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर वीस दिवसांपूर्वी आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.