जामखेड न्युज——
जामखेडचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेतून बांधखडक शाळेतील शिक्षण महोत्सवात पाठ्यपुस्तकातील कवींशी विद्यार्थ्यांचा संवाद
दिग्गज कविंसह बालकवींनी गाजवले कविसंमेलन
जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व उपक्रमशील शिक्षक मनोहर इनामदार यांच्या प्रेरणेने बांधखडक येथे शिक्षण महोत्सवात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पाठ्यपुस्तकातील कवींशी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांनी संवाद साधला तसेच दिग्गज कविंसह बालकवींनी कविसंमेलन गाजवले.
तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेतून जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथे दि.२१ते २५ नोव्हेंबर २०२३ या काळात संपन्न होत असलेल्या बांधखडक,वनवेवस्ती व चव्हाणवस्ती या तीन शाळांच्या संयुक्त ‘शिक्षणोत्सव’ समारंभाचे उद्घाटन कृष्णा श्यामराव पौडमल (बांधखडक),स्वरा दादाहरी दराडे(वनवेवस्ती) व विठ्ठल अंकुश चव्हाण (चव्हाणवस्ती) या तीनही शाळांतील विद्यार्थी प्रतिनिधींच्या शुभहस्ते मंगळवार दि.२१नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बांधखडकचे माजी सरपंच मा.श्री.केशव वनवे, विद्यमान सरपंच मा.श्री.राजेंद्र कुटे,उपसरपंच मा.श्री.तान्हाजी फुंदे पाटील ,ग्रामसेविका मा.श्रीम.स्वाती पटेकर यांच्यासह सर्व ग्रा.पं.सदस्य तसेच तीनही शाळांतील शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व सदस्य,शिक्षक आणि पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळी ९:३०ते सायं.५:०० यावेळेत कराटे प्रशिक्षक मा.श्री.श्याम पंडित, हस्ताक्षरतज्ज्ञ मा.श्री.संतोष घोलप,नृत्यप्रशिक्षक मा.श्री.सोहेल आतार,अनुष्का अंधारे व शिवानी वाघे तसेच सेवानिवृत्त मुख्या.तथा कार्यानुभव तज्ज्ञ मा.श्री.मोहन खवळे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
रात्री ८:०० ते १०:०० यावेळेत प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक तथा इ.८वीच्या पाठ्यपुस्तकातील ‘गोधडी’ या कवितेचे कवी मा.डाॅ.कैलास दौंड यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले.यात इ.३री व इ.९वीच्या पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश असलेले प्रसिद्ध रानकवी मा.श्री. तुकाराम धांडे,मा.प्रा.सय्यद अल्लाउद्दीन, मा.श्री.नागेश शेलार,मा.श्री.हरीश हातवटे ,मा.श्री.अजय भराटे,मा.श्री.रविंद्र तांबे व मा.श्री.कृष्णा मुळे या निमंत्रित दिग्गज कविंसह रविराज जयकुमार वारे,तन्मय मच्छिंद्र देशमुख,संस्कृती भाऊसाहेब वारे,वैभव जालिंदर दराडे व नयना बाबासाहेब वारे या विद्यार्थ्यांनी आपापल्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.प्रत्येक कविच्या कवितांना बांधखडकवासियांनी टाळ्यांच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला.कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कविवर्य मा.श्री.हरीश हातवटे यांनी केले.त्यांना साथ कु.भक्ती विजय वारे ,कु.श्रद्धा संभाजी गरड व कु.ऐश्वर्या जालिंदर वारे या विद्यार्थीनींनी दिली. प्रास्ताविक बांधखडक शाळेचे मुख्या.मा.श्री.विकास सौने यांनी तर आभार प्रदर्शन मा.श्री.मनोहर इनामदार यांनी केले.
या शिक्षणोत्सवात दि.२१ते २४नोव्हेंबर या काळात रोज सकाळी ९:३०ते सायं.५:०० या वेळेत योगासने,कराटे,लेझिम,कागदकात्रण काम,सुंदर हस्ताक्षर,नृत्य ,अभिनय ,चित्रकला,मनोरंजक विज्ञानखेळ इ.विषयांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना तज्ज्ञांमार्फत दिले जाणार असून शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी बाल आनंद मेळावा अर्थात विद्यार्थ्यांच्या खाद्य पदार्थांचे स्टाॅल्स मांडून विक्री (आनंदनगरी) केली जाईल तसेच भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
रोज रात्री ८:०० ते १०:०० यावेळेत सर्वांसाठी प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यात बुधवार दि.२२रोजी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवदास पोटे व परशुराम नागरगोजे यांचे कथाकथन होणार आहे. गुरूवार दि.२३रोजी बीड जिल्ह्यातील आदर्श शाळा जरेवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.श्री. संदीप पवार यांचे अध्यक्षतेखाली वरवंडी तांडा ता.पैठण
या शाळेतील उपक्रमशील शिक्षक तथा प्रसिद्ध व्याख्याते मा.श्री. भरत काळे यांचे व्याख्यान होईल व शुक्रवार दि.२४ रोजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम (गॅदरिंग) संपन्न होईल.
चौकट
शनिवार दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वा. ज्यांच्या प्रेरणेने या ऐतिहासिक व प्रेरणादायी शिक्षणोत्सवाचे आयोजन केलेले आहे असे जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व शिक्षक बांधव यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम होणार असून शिक्षणोत्सवात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे.
या शिक्षणोत्सवात नायगावचे केंद्रप्रमुख संतोष वांडरे व खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.सुनील जाधव यांचे मार्गदर्शन लाभणार असून या सर्व प्रेरणादायी उपक्रमांस पालक, ग्रामस्थ व तालुक्यातील साहित्य व शिक्षणप्रेमी कलारसिकांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन विकास सौने, मनोहर इनामदार ,नितीन जाधव,प्रविण शिंदे ,बाबा चव्हाण व प्रमोद कचरे या तीनही शाळांतील शिक्षकवृंदांकडून करण्यात आले आहे.