धनगर समाजाच्या आरक्षणासाठी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, यशवंत सेनेकडून स्वागत

0
474

जामखेड न्युज——

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, यशवंत सेनेकडून स्वागत

 

धनगर समाजाच्या आरक्षण प्रकरणी सरकारकडून मा मंत्री ,आमदार प्रा राम शिंदे साहेबांचे बंधु, मुंबई महानगर पालीकेचे आतीरीक्त आयुक्त मा श्री डॉ सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत यशवंत सेनेने केले आहे. मात्र आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. 

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याविषयी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. २१.९.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये, मध्यप्रदेश, बिहार व तेलंगणा या राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये त्या राज्यांतील जातनिहाय यादीमध्ये समावेश असलेल्या जाती/जमातींना कोणत्या निकषांच्या आधारे जात प्रमाणपत्र व अन्य लाभ उपलब्ध करुन दिलेले आहेत.

त्यासंदर्भात वरील राज्यांच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करण्यासाठी त्या राज्यात धनगर समाजाच्या प्रतिनिधींसह राज्यातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ / अभ्यासगट पाठवून त्याबाबतचा अहवाल प्राप्त करुन घ्यावा असे निदेश दिले आहेत.

उक्त पार्श्वभूमीवर, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाच्या
शिष्टमंडळ/अभ्यासगटामध्ये समावेश करावयाच्या शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्यांच्या नावांची शिफारस शासनास प्राप्त झाली असुन त्याप्रमाणे शिष्टमंडळ/अभ्यासगट स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.


मध्यप्रदेश, बिहार व तेलंगणा या राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये त्या राज्यांतील जातनिहाय
यादीमध्ये समावेश असलेल्या जाती/जमातींना जात प्रमाणपत्र तसेच अन्य लाभ उपलब्ध करुन देण्याबाबत अवलंबिलेल्या कार्यपध्दतीचा अभ्यास करण्यासाठी खालीलप्रमाणे “शिष्टमंडळ/अभ्यासगट” स्थापन करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे

शासकीय समिती सदस्य
अध्यक्ष
श्री. सुधाकर शिंदे (भारतीय राजस्व सेवा)
अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका,
मुंबई

सदस्य सचिव – दे. आ. गावडे सह सचिव इतर मागास बहुजन समाज विभाग मुंबई

सदस्य – संतोष गावडे उपसचिव महसूल विभाग मुंबई
सदस्य- धनंजय सावळकर अप्पर जिल्हाधिकारी
सदस्य- जगन्नाथ वीरकर अप्पर जिल्हाधिकारी

अशासकीय सदस्य
जे. पी. बघेल, एम. ए. पाचबैल, माणिकराव दांडगे, इंजि. जी. बी. नरवटे

अशा प्रकारे समिती स्थापन करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here