जामखेड न्युज——
मागील निवडणुकीत विकासासाठी ज्यांना सरपंच केले पण त्यांनी गावचा विकास सोडून स्वत: चे हित साधले -शहाजी पाटील
शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित

पाच वर्षांत विकासाचे काम केले नाही जुन्यांना विश्वासात घेतले नाही मात्र घराघरात भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे आम्ही पर्यायाने नविन पिढीला संधी दिली. मागिल निवडणुकीत उभे करुन ज्यांना निवडणुन दिले त्यांनी संधीच सोने करण्याऐवजी स्वतःच हित साधलं असे मत शहाजी (आप्पा) पाटील यांनी जामखेड न्युजशी बोलताना मत व्यक्त केले.
पुढे बोलताना शहाजी (आप्पा) पाटील म्हणाले की मागच्या वेळी जागा ओपन होती तरी अनेकांनी माघार घेऊन जेष्ठांच्या सांगण्यावरून ज्यांना संधी दिली होती. त्यांनी सत्ता हाती येताच मनमानी कारभार करत पाच वर्षात एकाही ग्रामपंचायत सदस्याला काम दिले नाही. १५ ऑगस्ट २६ जानेवारी अशा राष्ट्रीय सणाला पाच वर्षे एकच अध्यक्ष ठेवला. पाच वर्षांत पक्ष बदलत फक्त सत्ता जपली. गावात इतर कोणालाही मानसन्मान दिला नाही असे सांगितले.
शेतकरी ग्रामविकास आघाडी मार्गदर्शक म्हणून दत्तात्रय कोल्हे, प्रदिप दळवी, राजू महाजन, आर. डी. पवार, आजीनाथ हजारे, डॉ.पवार, दिपक पाटील, राजू राऊत, शहाजी पाटील पवार, राजू मोटे, पांडुरंग वाळके, दयानंद कथले, आयुब शेख, हुसेन सय्यद, सत्तार भाऊसाहेब यांच्या सह अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ काम करत आहेत.
चौकट
लोकनेते स्व. श्रीरंगभाऊ कोल्हे, स्व.किसनराव दळवी व स्व. प्रदिप (आबा) पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन या पॅनेलने सर्वपक्षीय पदाधिकार्याना एकत्र घेऊन पॅनल केलेला आहे. यांचे वारसदार बरोबर आहेत. मतदारांचा उत्फुर्त पाठिंबा आहे. लोक पाच वर्षांच्या कारभाराला, दडपशाहीला कंटाळले आहेत. त्यामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.


