जामखेड न्युज——
मराठा आरक्षणासाठी जामखेड शहरासह तालुक्यात कडकडीत बंद!!
मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, महिलांचे उपोषण, कँन्डल मार्च आणि आत बंद पुकारण्यात आला आहे. आज जामखेड शहरासह तालुक्यात सगळीकडे कडकडीत बंद पाळण्यात आला असून व्यापारी वर्गाने आपापली दुकाने स्वत होऊन दुकाने बंद ठेवून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.
मराठा आरक्षणासाठी “मराठा योध्दा” मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून अन्न पाण्याचा त्यागकरून मराठा समाजास आरक्षण मिळावे. म्हणुन प्राणात्तीक उपोषणास बसले आहेत. आतापर्यंत सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली नसुन त्यांची प्रकृती अंत्यत चित्ताजनक बनत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून जामखेड तालुका बंद ठेवण्यात आला आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
.
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. काल जामखेडमध्ये रणरागिणी मैदानात उतरल्या होत्या त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले तसेच काल कँन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता यासाठी हजारो महिला उपस्थित होत्या.
आज शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.