जामखेड न्युज——
नगरपरिषदेच्या रखडलेल्या पगारासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
जामखेड नगर परिषदेचे सफाई व आरोग्य कर्मचाऱ्याचे रखडलेले दोन महिन्यांचे पगार तातडीने द्यावेत व त्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड नगर परिषदे हद्दीमधील काम करणारे सफाई व आरोग्य कर्मचारी यांचे गेली दोन महिन्यापासून पगार करण्यात आलेले नाहीत. हे सर्व लोक गरीब असून त्यांचे हातावरचे पोट आहे. काम केल्याशिवाय या लोकांना उपजिविकेचा दुसरा पर्याय नाही. या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे घरगुती अडचणी व आर्थिक अडचणी असतात.
आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. कृपया आपण आमच्या अर्जाचा सहानभूती पूर्वक विचार करून या कामगारांना दिवाळीपूर्वी पगार व शक्य झाल्यास सदर कामगारांना दिवाळी निमित्त बोनस देण्यात यावा.
सदर मागणीचा विचार करून दोन महिन्याचा पगार व बोनस तातडीने मिळेल याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही मागणी वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्त आदिवासी आघाडीचे राज्य समन्वयक ॲड . डॉ. अरुण जाधव व जामखेड तालुका अध्यक्ष अतिष पारवे यांनी केली आहे.