जामखेड न्युज——
पुढाऱ्यांना जामखेड तालुक्यात गावबंदी
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खासदार, आमदारसह, राजकीय पुढाऱ्यांना जामखेड तालुक्यातील जामखेड शहरासह खर्डा, अरणगाव यासह ४० गावात गावबंदी करण्यात आली असून ठिकठिकाणी तसे फलक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लावण्यात आले आहेत. उर्वरित गावात दोन दिवसांत गावबंदीचे फलक लागणार आहेत. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
येत्या दोन दिवसांत संपूर्ण जामखेड तालुक्यात
गावबंधी होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा तर नाहीच, पण सत्ताधारी पक्षातील नेते वेगवेगळे विधान करून आंदोलन हिंसक कसे होईल हे पाहत आहेत.
त्यामुळे गावातील सर्व समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून कोणत्याच नेत्याला आम्ही गावात येऊ देणार नाही, असा एकमुखी निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील जामखेड शहर, खर्डा,
अरणगाव, रत्नापुर, पाटोदा, धोत्री, जामदारवाडी, पाडळी, कुसडगाव, भोगलवाडी, घोडेगाव, पिंपळगाव उंडा, पिंपळगाव आळवा, नात्रज, बोर्ला, सोनेगाव, सातेफळ, मुंगेवाडी, दौंडवाडी, वंजारवाडी, आपटी, तरडगाव, पोतेवाडी, जातेगाव, नायगाव, नाहुली, चोभेवाडी, तेलंगशी, भुतवडा, खुरदैठण, धनेगांव, वाकी, लोणी या गावात गावबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिली आहे.
उर्वरित गावात दोन दिवसांत गावबंदीचे फलक लागणार आहेत. तसेच जामखेड बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे.