अफजलखानाचा कोथळा काढलेली शिवरायांची वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात येणार!

0
369

जामखेड न्युज——

अफजलखानाचा कोथळा काढलेली शिवरायांची वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात येणार!!

 

 

महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठची अफलातून कृती करताना वाघनख्यांनी अफलजखानाचा कोथळा बाहेर काढला होता. असा देदीप्यमान आणि गौरवशाली वारसा असणारी छत्रपती शिवरायांची वाघनखे मुंबई आणण्यात येणार आहेत.

येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखे मुंबईत आणण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरून परत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. वाघनखे मुंबईत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या (1 ऑक्टोबर) लंडनला रवाना होणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत वाघनखे घेऊन येण्यासाठी 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आता महाराजांची तलवार कधी महाराष्ट्रात आणणार असा प्रश्न शिवप्रेमी विचारत आहेत.

 

असा असेल वाघनखांचा प्रवास

16 नोव्हेंबरला वाघनखांचे मुंबईत आगमन

17 नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखांची स्थापना

17 नोव्हेंबर 2023 ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान वाघनखे
सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील

15 ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत वाघनखे
नागपूर
येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.

एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या काळात वाघनखं
कोल्हापूर
येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.

नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 दरम्यान वाघनखे
मुंबई
तील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातील.

16 नोव्हेंबर 2026 रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाठवली जातील.


छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही सध्या ब्रिटनमध्ये आहे. ती परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. ही तलवार 2024 पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here