जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध गुणदर्शन व कौशल्य स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार श्री रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व आमदार रोहित दादा पवार मित्र मंडळ व मतदार कर्जत जामखेड यांच्यावतीने भव्य तालुकास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन व कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा ,चित्रकला या स्पर्धेमध्ये बालगट, किशोर गट, कुमार गट या गटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा व ल ना होशिंग विद्यालयात वकृत्व स्पर्धा रविवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये चौथी ते बारावी पर्यंतच्या 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
श्री नागेश विद्यालयात स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य मडके बी के , सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे व प्रमुख उपस्थिती साळुंखे बी एस, रघुनाथ मोहोळकर, प्रा कैलास वायकर ,कला शिक्षक मयुर भोसले, शिंनगारे एम एस, संतोष सरसमकर, लटपटे डी व्ही सह शिक्षक पालक ग्रामस्थ आदी मान्यवर यांच्या हस्ते झाले.
यावेळी निबंध – चित्रकला- हस्ताक्षर स्पर्धेचे पर्यवेक्षण गाडे पी एस, अशोक बोराटे ,शिंदे बी एस, विलास पवार, अशोक चौधरी, भूषण गडगुले, ज्योती पालकर , कला शिक्षक मुकुंद राऊत, बाळू डाडर, समन्वयक परमेश्वर राठोड ,अश्विनी समुद्रे, स्नेहा वारभव सर्वेश्वर चौके ,निखिल जगताप, सचिन वानरे, सोमनाथ मैड, सिद्धाराम कवडगाव, यांनी काम पाहिले. ल ना होशिंग विद्यालयामध्ये वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्याध्यापक पारखे सर यांच्या हस्ते झाले व परीक्षक ज्योती गोपाळघरे, मोहन यादव, शशिकांत सदाफुले, विनोद उगले, सचिन मोकाशी यांनी काम पाहिले.
परीक्षा समन्वयक कलाशिक्षक मयूर भोसले व शिव सोळंके शिक्षण समन्वयक यांनी नियोजन केले.
विविध स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे विद्यार्थी आनंदित व उत्साही होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नियोजनबद्ध पद्धतीमध्ये स्पर्धा संपन्न झाल्या शेवटी विद्यार्थ्यांनी आमदार रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सर्व स्पर्धेमध्ये 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.