जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव ओव्हरफ्लो तरीही शहरवासीयांना मिळते आठवड्यातून एकदाच पाणी

0
749

जामखेड न्युज——

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव ओव्हरफ्लो

तरीही शहरवासीयांना मिळते आठवड्यातून एकदाच पाणी

जामखेड शहरासाठी वरदान ठरलेला भुतवडा तलाव आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला आहे. संपूर्ण जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा होत आहे. तलाव भरल्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा नागरिकांना आहे. पण तलाव भरला तरी शहरवासीयांना आठवड्यातून एकदाच एक तास पाणी मिळत आहे. दोन्ही आमदारांच्या श्रेयवादात अडकलेली उजणी पाणीपुरवठा योजना ताबडतोब मंजूर व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे.

जामखेड शहराची जीवनवाहीनी असलेला भुतवडा तलाव आज सकाळी आठ वाजण्यापुर्वी काठोकाठ भरला असून बंधाऱ्यावरून पाणी पडण्यास सुरुवात झाली झाली असल्याची अधिकृत माहिती जामखेड लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी उ.वि. कंगणकर, शाखा अभियंता ग .रा. काळे, ल.पा.तलाव इनचार्ज आबासाहेब नेटके भूतवडा यांनी भुतवडा तलाव भरल्याची माहिती दिली आहे.

चालू वर्षी आतापर्यंत पावसाळा जवळपास कोरडाच गेल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. शेतकरी चिंतेत असल्यास संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते. तालुक्यात अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची टंचाई आहे. जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. श्रावण महिना ही जवळजवळ कोरडाच गेला. गेल्या तीन चार वर्षापासून दरवर्षी तलाव भरतो पण पिण्याचे पाणी आठवड्यातून एकदाच मिळते आहे. आता दोन दिवसाआड पाणी मिळावे अशी मागणी होत आहे.

 

जामखेड तालुक्यातील शेती ही संपूर्णतः पावसावर विसंबून आहे. त्यातच यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळजवळ वाया गेल्यासारखा आहे.

गौरी गणपतीचे आगमन होताच जामखेड शहर व तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता काहीशी दूर होणार आहे. पण खरीप हंगाम वाया गेला आहे.

गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीनही दिवस तालुक्यात ठीक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. शनिवारी मात्र दिवसभर या परिसरात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 

शनिवारच्या पावसामुळे सौताडा धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेले बंधारे भरून वाहू लागले व पावसाचा जोरही चांगला असल्यामुळे विंचरणा नदीतून झालेल्या जोरदार प्रवाहामुळे भुतवडा तलाव रात्रीतून पूर्ण क्षमतेने भरला.

आज सकाळी आठ वाजल्यापासून भुतवडा तलावाच्या सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली झाली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या विंचरणा नदीलाही आज पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली दिसत आहे.

जामखेड शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. मात्र आज भरलेल्या भुतवडा तलावामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ातची चिंता संपली असून शहरवासीयांना मोठा आनंद झाला आहे. आता दोन दिवसाआड पाणी मिळावे अशी मागणी होऊ लागली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here