नगरसेवक मोहन पवार यांच्या युवाशक्ती प्रतिष्ठान गणपतीची मुख्याधिकारी साळवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती

0
786

जामखेड न्युज——

नगरसेवक मोहन पवार यांच्या युवाशक्ती प्रतिष्ठान गणपतीची मुख्याधिकारी साळवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती

 

नगरसेवक मोहन पवार, मातोश्री क्रीडा संकुलन व मातोश्री लाल आखाडा हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. शहरातील गणेश मंडळ डिजेमुक्त व्हावेत पर्यावरण पुरक असावेत तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळास विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यांच्या युवाशक्ती प्रतिष्ठान या गणपतीच्या आरतीसाठी विविध मान्यवर हजेरी लावतात जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे व त्यांच्या पत्नी कविता साळवे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.

 

जामखेड शहरातील जे गणेश मंडळे डिजे विरहित मिरवणूक, पारंपरिक देखावे, महिलांची व्यवस्था, गणपती उत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था, अशा विविध अटी व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करणाऱ्या जामखेड शहरातील गणेश मंडळांना मोहन पवार मित्र मंडळाच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार असून रोख रक्कम, ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक ११ हजार, द्वितीय क्रमांक ७ हजार तर तृतीय क्रमांक ५ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहेत सहभागी मंडळास प्रमाणपत्र देण्यात येईल.


जामखेड शहरातील जे गणेश मंडळ शासनाचे नियम अटी पाळून उत्कृष्ट देखावा करतील त्यांच्यासाठी मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लाल आखाडा यांच्यातर्फे बक्षिसे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असलेले हे दुसरे वर्षे आहे.
नगरपरिषदेचे नगरसेवक व मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लाल आखाडाचे संस्थापक अध्यक्ष असून ते नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवतात. मागील वर्षीही त्यांनी हा उपक्रम राबविला होता.

डिजे विरहित मिरवणूक, पारंपरिक देखावे, महिलांची व्यवस्था, गणपती उत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था, अशा विविध अटी व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करतील त्यांना बक्षीसे दिली जाणार असल्याचे मोहन पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here