जामखेड न्युज——
धनगर समाज अधिक आक्रमक होणार – किशोर मासाळ
दहा दिवसांत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास उजणी धरणात सामुहिक जलसमाधी घेणार – डाॅ शशिकांत तरंगे
धनगर आरक्षण प्रश्नी गेल्या सतरा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आता राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. खंबाटकी घाटात मेंढ्या सह आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. आरक्षणाचा निर्णय न झाल्यास धनगर समाज अधिक आक्रमक होणार असे किशोर मासाळ यांनी सांगितले. तसेच दहा दिवसांत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास उजणी धरणात सामुहिक जलसमाधी घेणार असे डाॅ शशिकांत तरंगे
यांनी सांगितले.
धनगर आरक्षण प्रश्नावरती धनगर समाज आक्रमक झालेला दिसत आहे. खंडाळा तालुका खंबाटकी घाट येथे जवळपास दोन राष्ट्रीय महामार्ग अडवत सरकारचा निषेध करण्यात आला. चौंडी येथे धनगर आंदोलक 17 दिवस अमरण उपोषणास बसलेले असताना शासन फक्त बघ्यांची भुमिका घेत असल्याने आंदोलकांमध्ये काल भडका उडाल्याचे दिसले.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून समाज बांधव खंडाळा येथे शासनाचा निषेध करण्यासाठी आले होते. सर्व पक्षीय व सर्व सामाजीक संघटनेचे पदाधिकारी एकाच ठिकाणी आल्याचे पहायला मिळाले. मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील आंदोलक रास्ता रोको वर ठाम होते. यापुढे आंदोलन हे आणखी आक्रमक होणार असल्याचे आंदोलन कर्ते किशोर मासाळ यांनी भाषणात सांगितले.
10 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास उजणी धरणात सामुदायिक जलसमाधी घेणार असल्याचे डाॅ शशिकांत तरंगे यांनी सांगितले विश्वासराव देवकाते व समाजबांधवांनी आत्महत्या किंवा वेगळा मार्ग कोणी घेऊ नये असे अहवान केले.