जामखेड न्युज——
सचिन वराट सरांतर्फे वाढदिवसानिमित्त श्री साकेश्वर विद्यालयास डायस भेट
आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत शाळेची गरज ओळखून विद्यालयात डायस भेट दिला आहे. यामुळे सचिन वराट सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
श्री साकेश्वर विद्यालयास डायसची आवश्यकता होती. हीच गरज ओळखून सचिन वराट सरांनी डायस भेट दिला यावेळी ज्येष्ठ शिक्षक राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, डॉ. प्रशांत पाखरे, डॉ. जेधे यांच्या सह अनेक मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेत वेगवेगळे सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम घेत असताना डायसची आवश्यकता गरज जाणवत होती हिच गरज ओळखून सचिन वराट सरांनी विद्यालयात डायस भेट दिला. यामुळे वराट सरांचे कौतुक होत आहे.