जामखेड न्युज——
मराठा आरक्षणासाठी सोनेगाव ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर भव्य असा बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा
एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देत सोनेगाव सौंदाणे येथील लहान थोरांसह महिला मोठ्या संख्येने बैलगाडी व ट्रॅक्टर सह भव्य दिव्य असा मोर्चा काढत “एक मराठा लाख मराठा”, “एकच मिशन मराठा आरक्षण” अशा घोषणांनी पाटोदा शहर दणाणून सोडले.
तहसील कार्यालयावर मोर्चा गेल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले यावेळी बोलताना सर्वच वक्ते खूपच आक्रमक भावना व्यक्त करत होते. “मुख्यमंत्री साहेब तुम्ही बोलून मोकळे झालात” “आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला घरी बसून मोकळे करू” असा इशारा दिला मोर्चात लहान बालके, महिला तसेच युवकांसह आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतराली सराटी येथे सतरा दिवस उपोषण केले सरकारने एक महिन्याची मुदत मागितली तेव्हा उपोषण मागे घेण्यात आले तरीही राज्यत अनेक ठिकाणी लोकशाही पद्धतीने साखळी उपोषण, निदर्शने, मोर्चे सुरूच आहेत.
आज संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले ते सोनेगाव सौंदाणे येथील ग्रामस्थांच्या बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चाने पाटोदा शहरात मोर्चा येताच “एक मराठा लाख मराठा”, “एकच मिशन मराठा आरक्षण” अशा घोषणांनी पाटोदा शहर दणाणून सोडले.