जामखेड न्युज——
मराठा समाजाचा अंत पाहू नका, मराठा पेटला तर महाराष्ट्रात उद्रेक होईल,
आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने केले जामखेड मध्ये चक्काजाम आंदोलन
आज पर्यंन्त मराठा समाज्याने शांततेच्या मार्गाने अठ्ठावन्न मोर्चे काढले, अठ्ठेचाळीस मराठा बांधवांनी बलिदान दिले आहे .सध्या जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे. मात्र तरी देखील सध्याचे सरकार व सर्वच राजकीय नेतेमंडळी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी चालढकल करीत आहेत. मराठा समाजाच्या अंत पाहु नका मराठा पेटला तर महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलना दरम्यान देण्यात आला.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले त्यांना पाठिंबा व मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. दरम्यान जामखेड शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने खर्डा चौकात आज रविवार दि १० रोजी सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुक्यातील सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलना दरम्यान सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की सध्याचे सरकार आरक्षण देण्यासाठी वेळकाढू पणा करीत आहे. नऊ वर्षे झाले तरी हे सरकार आरक्षणावर अभ्यास करत नाही तर आमदार कसे फोडायचे याचा अभ्यास करीत आहे. ३७० कलम हटवता, एका दिवसात सरकार स्थापन करता मग आरक्षणासाठी एवढी वर्षे का लावता.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याला सर्वच राजकीय नेते मंडळी जबाबदार असतील, पोलिसांनी ३६६ जनांनवर गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यात यावेत. जरांगे पाटलांसारखा वाघ महाराष्ट्र हालवत आहे आणि मराठे पेटले तर दिल्ली हलवल्या शिवाय रहाणार नाही.
कर्जत जामखेडच्या दोन्ही आमदारांनी मराठा समाज्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. महाराष्ट्र सरकार जे ठरवेल ते एका रात्रीत होते मात्र मराठा आरक्षणच का मिळत नाही? कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागत आहेत. जर मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे आणि मराठ्यांची ताकत दाखवली पाहिजे.
आंदोलना दरम्यान ज्ञानेश्वरी भोगिल हीने देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी जाकीर शेख सर यांनी मुस्लिम समाजाच्या वतीनेव पाठींबा दिला. नय्युम शेख यांच्या वतीने प्रहर संघटनेच्या वतीने तर यासीन शेख यांनी जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तर जामखेड तालुका वकील संघटनेच्या वतीने देखील सकल मराठा समाजाच्या वतीने पाठींबा देण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्वच सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.