जामखेड न्युज——
मनोज जरांगे च्या आईचा टाहो
माझं लेकरू 11 दिवसांपासून अन्न पाण्यावाचून
माझं लेकरू 11 दिवसांपासून अन्न पाण्यावाचून
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपाशीपोटी बसले आहे. माय-बाप सरकारने समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आई प्रभावती रावसाहेब जरांगे यांनी करताच संपूर्ण उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकांचे डोळे पाणावले.
मनोज जरांगे पाटील यांच्या 90 वर्षीय आईसह, बहीण, संपूर्ण कुंटंब जालन्यातील अंतरवाली सराटी येथे व्यासपीठावर येताच वातावरण भावूक होऊन सुन्न झाले होते. हुंदके, अश्रुंमुळे वातावरण निशब्द होऊन सर्व गहिवरून गेले होते.
आई प्रभावती जरांगे यांनी आपल्या लढवय्या लेकाची भेट घेतली. आईला उपोषणस्थळी येताना पाहून जरांगे पाटील यांच्या काळजात कालवाकालव झाली. जरांगे पाटील यांचं मन हेलावलं. आई जवळ येताच जरांगे पाटील यांनी आईच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी आईला घट्ट मिठी मारली.
यावेळी दोघेही भावूक झाले होते. आपला मुलगा
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देतोय म्हणून 90 वर्षीय प्रभावती जरांगे कालपासून या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. ‘माझी आई माझं कुटुंब येथे आले असले तरी मी आता कुटुंबाचा नाही, माझ्या आईचा नाही, मी आता महाराष्ट्राचा, माझा आई-बाप महाराष्ट्र, गावकरी माझे माता पिता, आज समाजाचा उद्या तुमचा, घरी आल्यावर मी तुमचा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.