जामखेड न्युज——
शिवनेरी अँकँडमी सिमेवरील सैनिक घडविते – हभप प्रकाश महाराज बोधले
शिवनेरी अँकँडमी येथे शिक्षक दिनानिमित्त आजी माजी शिक्षकांचा सन्मान
आज वाडी वस्ती वरील मुले अधिकारी होत आहेत हाच खरा शिक्षकांना सन्मान आहे. राष्ट्राच्या प्रगतीत शिक्षकांचा वाटा मोठा आहे. चांगल्या ठिकाणी तर मुले मिरीट मध्ये येणे खरे काम नाही वाडी वस्ती वरील मुले मिरीट मध्ये येणे खरे काम आहे. आपली संस्कृती पूजनीय आहे. पूजन विचाराचे होते. ज्या गोष्टीतून लोकांचा उत्कर्ष होतो त्याचे पुजन होते. यामुळेच शिक्षकांचा आजच्या दिवशी सन्मान केला जातो. शिवनेरी अँकँडमी सिमेवरील सैनिक घडविते असे मत आखील भारतीय वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांनी व्यक्त केले.
शिवनेरी अँकँडमीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे व त्रिदल संघटना यांनी आज शिक्षक दिनी आजी माजी शिक्षकांचा सन्मान आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आखील भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप. प्रकाश महाराज बोधले, प्रा. मधुकर राळेभात, प्राचार्य शिवानंद हलकुडे, रमेश वराट, बी. के. मडके, प्रा. सुनील नरके, एनसीसी प्रमुख गौतम केळकर, मयुर भोसले, काकडे जी. के, दिगंबर चव्हाण, आदर्श शिक्षक राजकुमार थोरवे, आदर्श शिक्षक एकनाथ चव्हाण, गुलाब जांभळे, गोलाईत सर, लहू सानप, विधाते सर, नागरगोजे सर, पवार सर, डॉ. सुनील पुराने, बनकर साहेब, तात्या घुमरे, आभार कॅप्टन लक्ष्मण भोरे, परशुराम नागरगोजे, अमोल राऊत, रमेश मोरे, राजू बोराटे, सुग्रीव आडाले, अशोक चव्हाण, नानासाहेब कार्ले, दत्तात्रय डिसले, शिवाजी चव्हाण, जयसिंग तुपे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश महाराज बोधले म्हणाले की, आपल्या देशाच्या द्रोपती मुर्मू राष्ट्रपती झाल्या हाच खरा भारतीय लोकशाहीचा विजय आहे.
आपल्या ॠषी मुनींनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी देवक संकल्पना आणली म्हणून यांचे पूजन करतात यातून पर्यावरण संतुलन राहते हवा स्वच्छ राहते. शाळा काँलेजने विद्यार्थी घडविले पण शिवनेरी अँकँडमीने सिमेवरील सैनिक घडविला या मातीचा सन्मान हेच भविष्यातील सैनिक करणार आहेत. असे महाराज म्हणाले.
यावेळी बोलताना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एकनाथ चव्हाण म्हणाले की, गुरूच्या हस्ते सन्मान हे माझे भाग्य आहे. जामखेड करांना सकाळी व्यायामाची सवय लावणारे कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान करत चांगला पायंडा निर्माण केला आहे.
माजी मुख्याध्यापक काकडे जी. के म्हणाले की,
शिक्षक समाजसुधारक असतो. आपणच आपला सन्मान ठेवला पाहिजे. ध्येय निश्चित करा व प्रयत्न करा, निश्चित यश मिळेलच असे सांगितले.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आभार व्यक्त करताना शिवनेरी अँकँडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे म्हणाले की, नऊ वर्षात अँकँडमी मध्ये 175 विद्यार्थी सैन्यात दाखल झाले हीच खरी आमची कमाई आहे. आम्ही शिस्तप्रिय, व्यसनमुक्त, आई वडिलांची सेवा करणारे सैनिक घडवितो असे सांगितले.