शिक्षकदिनी गुरूदक्षिणा म्हणून शाळेस एक लाख दोन हजार सहाशे एक रुपयांची देणगी भीमराव सांगळे यांनी सारोळा शाळेस गुरूदक्षिणा देत राबविला स्तुत्य उपक्रम

0
104

जामखेड न्युज——

शिक्षकदिनी गुरूदक्षिणा म्हणून शाळेस एक लाख दोन हजार सहाशे एक रुपयांची देणगी

भीमराव सांगळे यांनी सारोळा शाळेस गुरूदक्षिणा देत राबविला स्तुत्य उपक्रम

 

शिक्षक दिनाचे औचित्य साधत जि.प.प्रा.शाळा सारोळा शाळेचे माजी विद्यार्थी, इंजिनीयर भीमराव सांगळे यांची सारोळा शाळेस एक लाख दोन हजार सहाशे एक रुपयांची गुरुदक्षिणा देत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. परिसरात त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.


मिशन आपुलकी अंतर्गत सारोळा शाळेचा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भिमराव सांगळे साहेब यांनी आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत एक लाख दोन हजार सहाशे एक रुपयांची रोख स्वरूपात भरीव आर्थिक मदत केली.यामुळे सारोळा शाळेतील बालगोपाळांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यात नक्कीच मदत होणार आहे.आजच्या शिक्षक दिनासारख्या पवित्र दिवशी सारोळा शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण दिलेली एक लाख दोन हजार सहाशे एक रुपयांची देणगी आज खऱ्या अर्थाने सारोळा शाळेसाठी गुरुदक्षिणाच म्हणावी लागेल.

भिमराव सांगळे साहेबांनी सारोळा शाळेस केलेल्या मदतीचीचे सारोळा गावचे सरपंच अजय काशिद, उपसरपंच हर्षद मुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सातपुते,उपाध्यक्ष राजेंद्र आजबे, पालक, ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.तसेच जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी धनवे साहेब यांनी प्राप्त केलेल्या लोकसहभागाबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here