जामखेड न्युज——
श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक राजकुमार थोरवे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
श्री साकेश्वर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राजकुमार थोरवे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित, राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजकुमार थोरवे हे जिजामाता माध्यमिक हायस्कूल देवदैठण येथे सहशिक्षक म्हणून १९९४ साली रूजू झाले. येथे इंग्रजी विषयाच्या अध्यापनाबरोबरच क्रीडा शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली त्यांच्या प्रयत्नातून अनेक विद्यार्थी घडले तसेच महाराष्ट्र छात्र सेनेच्या माध्यमातून देवदैठण येथील अनेक विद्यार्थी सैन्य दलात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध पदांवर विराजमान आहेत. तसेच वीस वर्षे देवदैठण येथे सेवा केल्यानंतर दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयात नियुक्ती झाली.
यानंतर २०१५ पासून श्री साकेश्वर विद्यालयात बदली झाली ते आजपर्यंत या विद्यालयात सेवा करत आहेत. प्रभावी अध्यापनाबरोबरच क्रीडा क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आहेत. शैक्षणिक उपक्रमाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात ते सतत पुढे असतात. गोरगरीब विद्यार्थांना मदत, तसेच शालेय शिस्त, विद्यालयात वृक्षारोपण यात नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या याच कार्याचा गौरव राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित, राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर करत केला आहे.
त्यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर होताच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच, शिवपट्टन ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्षा ज्योतीताई गोलेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद भोरे, डॉ. संजय भोरे, माजी उपसरपंच सुरेश भोरे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, हभप कैलास महाराज भोरे, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग व सर्व स्टाफ, श्री साकेश्वर विद्यालयायाचे मुख्याध्यापक दत्ता काळे व सर्व स्टाफ व विद्यार्थी, जिजामाता माध्यमिक हायस्कूल देवदैठणचे मुख्याध्यापक संजय वराट व सर्व स्टाफ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्रा. अरूण वराट, श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य रमेश अडसूळ, न्यू इंग्लिश स्कूल राजुरीचे मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, तसेच जामखेड तालुका क्रीडा संघटना याचबरोबर डॉ. भगवानराव मुरूमकर, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य शहादेव वराट, पोलीस पाटील महादेव वराट, राम ढवळे, छावा छात्रवीर संघटनेचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष शत्रुघ्न भोसले, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष बेंबळे तसेच माजी सरपंच गोविंदराव भोसले, माजी उपसरपंच एकनाथराव भोसले,कल्याणराव मेटे, अंबॠषी मेटे, अरूण थोरवे, गोपाळवाडीचे सरपंच संतोष थोरवे, माजी सरपंच नेताजी चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.