Monday, January 26, 2026
Home ताज्या बातम्या सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे आयोजित विनोदाची तुफान मेजवानी -” जाऊ द्या ना...

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे आयोजित विनोदाची तुफान मेजवानी -” जाऊ द्या ना राव ” टिमचे जामखेड येथिल कोरोनाबाधित रुग्णांसाठी उद्या आरोळे कोविड सेंटरमध्ये मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन

0
350

जामखेड प्रतिनिधी

           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 

      कोरोना रूग्णांच्या मनातील भीती घालवण्यासाठी व रूग्णांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांचे मनोरंजन करण्यासाठी सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आरोळे कोविड सेंटरमध्ये ” जाऊ द्या ना राव ” या तुफान विनोदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
          “जाऊ द्या ना राव” च्या टिमचा कोविड दौरा आता जामखेड येथिल महाराष्ट्र शासन, डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा अरोळे यांच्या निरीक्षणाखाली तसेच आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने उभारलेल्या कोविड सेंटर येथे रविवार दि. ६ जून रोजी ठीक पाच वाजता होणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी दिली.
        ” जाऊ द्या ना राव ”  च्या टीममुळे नगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचे भरपूर मनोरंजन होत आहे. त्यामुळे जामखेड मधील रूग्णांसाठी विनोदाची खास मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. लाॅकडाउन काळातील या नियोजित दौऱ्याचा हा पाचवा प्रयोग आहे. कोरोना बाधित रूग्णांचे भरपूर मनोरंजन होत आहे तसेच त्यांचे मनोधैर्यही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
      औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटर मध्ये सध्या ६०० च्या आसपास कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. या सर्वांचे खास मनोरंजन होणार आहे. मानसिक मनोधैर्य उंचावून लवकरात लवकर रूग्ण बरे होण्यास मदत होणार आहे.
        चौकट
सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी पदरमोड करून शहरासह तालुक्यात वेगवेगळी समाजोपयोगी कामे करून रस्ते, पिण्याचे पाणी, मंदिराचा जीर्णोद्धार, शाळांमध्ये एलईडी प्रोजेक्टर, शाळांसाठी होमथेअटर परिसरात मोठय़ा वृक्षारोपण करून
झाडांना संरक्षक जाळी बसवून उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा केल्याने परिसर हरित झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात कुपनलिका घेऊन पाण्याची सोय तसेच सध्या अनेक ठिकाणी वाडी वस्तीवर रस्ता तयार करून मुरमीकरण करून रस्त्याच्या कडेने हायमॅक्स दिवे बसवल्याने लोकांची चांगली सोय झाली आहे. गोशाळेतील गायींना हिरवा चारा देणे, कोरोनापासुन संरक्षण व्हावे म्हणून शहरात शासकीय कार्यालयात रूग्णालयत मास्कचे वाटप स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी माझी वसुंधरा अभियान स्पर्धा, स्वच्छता हि लोकचळवळ बनवली व आता कोरोना रूग्णांसाठी मनोरंजनाचा तुफान विनोदी कार्यक्रम आयोजित करणे यामुळे आपल्या समाजसेवेचा वेगळा ठसा रमेश (दादा) आजबे यांनी उमटवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!