जामखेड न्युज——
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ जामखेड शहरासह तालुक्यात शांततेच्या मार्गाने कडकडीत बंद
सकल मराठा समाजाच्या वतीने काल जामखेड तालुक्यात बंद ची हाक देण्यात आली होती. या हाकेला जामखेड शहरासह तालुक्यातील व्यापारी व ग्रामस्थांनी पाठींबा देत आपली दुकाने बंद ठेवत मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे दिवसभर जामखेड शहरासह खर्डा, व इतर अनेक गावातील बाजारपेठ बंद होत्या त्यामुळे शुकशुकाट दिसून येत होता. शांततेच्या मार्गाने कडकडीत बंद पाळण्यात आला.
व्यापाऱ्यांनी व छोटे मोठे दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही शांततेच्या मार्गाने जामखेड बंद ठेवणार आहोत.
तसे निवेदन कालच तहसीलदार यांना देवून जामखेड बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता जामखेडच्या व्यापाऱ्यांनी व छोटे मोठे दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी पोलीसांनी कोठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. व्यापाऱ्यांनी स्वयंपुर्तीने आपली दुकाने बंद ठेवल्याने जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने व्यापारी व ग्रामस्थांचे आभार मानले.