जामखेड न्युज —–
जामखेडचे धावपट्टू डॉ.पांडुरंग सानप यांची जगातील सर्वात कठीण अशा लेह लडाख येथील खरदूंगला रनिंग स्पर्धेसाठी निवड
8 सप्टेंबर रोजी होणार स्पर्धा
जामखेड येथील धावपटू डॉ. पांडुरंग सानप यांनी आतापर्यंत दोन वेळा आयर्न मॅन स्पर्धा, पाच वेळेस 50 किलोमीटरची मॅरेथॉन, सहा वेळेस 42 किलोमीटरची मॅरेथॉन, आणि दहा ते पंधरा वेळेस 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन, या आणि अशा अनेक स्पर्धांमधून भाग घेतलेला आहे,
आता येत्या 8 सप्टेंबर 2023 रोजी लेह लडाख येथे कमी ऑक्सिजन लेव्हल व बर्फ आणि जास्त उंचीवर एक खरदूंगला चॅलेंज ( 72km ) बहात्तर किलोमीटर ची रनिंग ची स्पर्धा आहे. त्यामध्ये डॉ. पांडुरंग सानप यांनी भाग घेतलेला आहे.
यामध्ये जगातून फक्त 200 स्पर्धकांना सहभाग घेता येतो व त्यासाठी कॉलिफिकेशन चाचणी ही फार अवघड असते त्या सर्वांचाचणीमधून डॉ. सानप हे यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. त्यामुळे त्यांची
या स्पर्धेत निवड करण्यात आलेली आहे.
येथील ऑक्सिजनचे प्रमाण 60 ते 70 टक्केच असते बाकी इतर जगामध्ये कुठे गेले तरी 98, 99 टक्के शंभर टक्के ऑक्सिजन असतो, याच ठिकाणी फक्त ऑक्सिजन लेव्हल कमी असते. ते पण जास्त उंचीवर असल्यामुळे आणि ही जगातील सर्वात अवघड अशी स्पर्धा आहे. यासाठी जामखेड करांच्या वतीने डॉ सानप यांना शुभेच्छा दिल्या आहेत.