जामखेड न्युज——
दुष्काळ जाहीर न झाल्यास मंत्र्यांना कर्जत- जामखेड मतदार संघात पाय ठेवून देणार नाही -ॲड. डॉ. अरुण जाधव
पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शासनामार्फत नुकसान भरपाई मिळावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली खर्डा चौक व तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, लोक अधिकार आंदोलन प्रवक्ते बापू ओहोळ, जिल्हा संघटक भीमराव चव्हाण, लोक अधिकार आंदोलन तालुका अध्यक्ष विशाल पवार, गणपत कराळे, सचिन भिंगारदिवे, अजझर काजी,मुक्तार सय्यद,अलीम शेख, ॲड. शमा हाजी कादर, अनिल जावळे,कुलदीप ससाने,सिताराम खाडे, युवराज कराळे,शुभम जाधव ,अरविंद जाधव,नंदू पोकळे दिलीप जाधव,शहानुर काळे,आलेस पवार,द्वारका ताई पवार,रेश्मा बागवान, राजू शिंदे,दिपाली काळे,पूजा काळे,शिवराम जाधव,भिमराव सुरवसे,सुनील काळे, तुकाराम शिंदे ऋषिकेश गायकवाड,हे उपस्थित होते.
ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे पावसा-अभावी जळालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व जनावरांसाठी चारा छावणीची सुरुवात करावी. इथल्या पुढार्याने व प्रशासनाने या बळीराजाचा विचार करावा ज्यांना आपण कणा म्हणतो त्या बळीराजामुळे सगळी जनता सुखी असते पण या बळीराजाला निसर्ग साथ देत नाही आणि एकीकडे शासन पुढारी नुसती बघण्याची भूमिका घेत आहे.या शेतकऱ्याने कर्ज घेऊन बी बियाणे खते खरेदी करून खरीप पिकाची पेरणी केली आहे.आज दोन महिने झाले पाऊस पडत नाही हाती तोंडाला आलेला घास निघून जातो या चिंतेत आभाळाकडे हा बळीराजा बघत बसला आहे.हे का कळत नाही या पुढार्यांना व प्रशासनांना प्रशासन म्हणते शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे.जर जगाचा पोशिंदा चिंतेत असेल तर मग का करू नये पिकांचे पंचनामे आज तालुक्यात कर्जबाजारी झाल्याचा तणाव व कुटुंबाची उपजीविका चालवण्याची चिंता यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळू शकतो.असे ॲड.डॉ.अरुण आबा म्हणाले.
यावेळी नायाब तहसिलदार महेश अनासरे, मंडल अधिकारी आशोक गीते साहेब, मा.बापू ओहोळ, विशाल पवार,वैजिनाथ केसकर, अहजर काझी , संतोष चव्हाण,गणपत कराळे, भिमराव चव्हाण यांनी निदर्शने आंदोलनाची भूमिका मांडली.