जामखेड न्युज——
राजुरीचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत, आमदार प्रा राम शिंदे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा सत्कार केला – सरपंच सागर कोल्हे
राजुरीचे चेअरमन हरीभाऊ उगलमुगले यांनी
जिल्हा बँकेचे संचालक अमोलशेठ राळेभात व माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी बोलवले होते. ते आमदार आहेत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या हस्ते सत्कार स्विकारला त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये, येणाऱ्या काळात रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे चेअरमन हरीभाऊ उगलमुगले हे करत राहतील असे सरपंच सागर कोल्हे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

राजुरीचे चेअरमन हरीभाऊ उगलमुगले यांची चेअरमन म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार प्रा. राम शिंदे यांनी सत्कार केला होता तेव्हा भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी उगलमुगले यांचा भाजपात प्रवेश तसेच आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करणार अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिले आहे.






