जामखेड न्युज——
धक्कादायक बातमी ——
जामखेडमध्ये पोलीसांच्या तपासात स्कुटीत सापडले पिस्टल व सहा जिवंत काडतुसे

लहान मुलांना आठजण मारहाण करत असताना भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला चाकूने व वस्ता-याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत दाखल फिर्यादीवरून पोलीस तपासात विना नंबरच्या स्कुटीत एक पिस्टल व सहा जिवंत काडतुसे सापडली याबाबत दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

जामखेड पोलीसात दिलीप गायकवाड (वय 24 वर्षे, जामखेड) यांनी फिर्याद दिली की, दि. 29 रोजी रात्री साडेआठ वाजता. आरोपी अभिजीत माने, तुषार पवार, सोमनाथ पवार, भरत जायगुडे, राहुल शिरगीरे, नामदेव शिरगीरे, तुषार ऊर्फ टी.डी. (सर्व रा. जांबवाडी, ता. जामखेड), अक्षय शिंद (रा. खाडेनगर, जामखेड) असे सर्वजन अनोळखी तीन लहान मुलांना मारहाण करत असल्याने यातील फिर्यादी यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा आरोपींना राग आल्याने अभिजीत माने, तुषार पवार यांनी फिर्यादीला जीवे मारण्याचे उद्देशाने चाकुने व वस्ताऱ्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी व फिर्यादी यांचे आई-वडील यांना देखील त्यांचे राहते घरात घुसुन लाथा बुक्क्याने मारहाण केली. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशनला येथे गु.र.नं. 343/2023 भादवि कलम 307,452,323,504,506,147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती करत असताना घटनास्थळावर विनानंबरची चावी नसलेली स्कुटी दिसली ती स्कुटी मारहाण करणाऱ्या इसमाची असलेची सांगितले. स्कुटीची डीक्कीची पाहणी दोन पंचासमक्ष तोडून उघडून पाहिली असता त्यामध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व सहा जीवंत राऊंड मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह मोटार वाहन कायदा कलम 39 / 192 (1) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी तुषार पवार व अक्षय शिंदे यांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, विवेकानंद वाढणारे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, पोकॉ सचिन देवढे, पोकॉ विजय सुपेकर, यांचे पथकाने केली आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करीत आहे.


