मुलीच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील मुलींसाठी निवारा उभारणार – आकाश बाफना बाफना परिवाराची अशीही सामाजिक बांधिलकी

0
157

जामखेड न्युज——

मुलीच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील मुलींसाठी निवारा उभारणार – आकाश बाफना

बाफना परिवाराची अशीही सामाजिक बांधिलकी

 

जामखेड येथील युवा उद्योजक आकाश बाफना यांनी आपले वडील जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप बाफना यांच्या सामाजिक कामाचा वसा व वारसा पुढे चालू ठेवला आहे. आपल्या मुलीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ, निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला यावेळी मुलींसाठी निवाऱ्याची अडचण लक्षात घेऊन दोन रूम बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. बाफना परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आदर्श फाउंडेशन तर्फे, चिरंजीवी क्रिशा आकाश बाफना हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता-जामखेड जि- अहमदनगर येथे मुलींच्या वसतिगृह मुलींच्या निवारासाठी दोन रूम बांधून देण्याचे प्रथम वाढदिवसानिमित्त औचित्य साधले आहे.

युवा उद्योजक आकाश बाफना यांनी आपल्या चिमुकली क्रिशा हिचा पहिला वाढदिवस निवारा बालगृहात साजरा करण्याचे ठरवले यानुसार निवारा बालगृहात वाढदिवस साजरा करत असताना येथील मुलींसाठी स्वतंत्र जागा नाही मुलींसाठी स्वतंत्र जागा हवी म्हणून लगेच वाढदिवसाचे औचित्य साधत दोन रूम बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला या सामाजिक कामाबद्दल बाफना परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी युवाउद्योजक आकाश बाफना, माझी जिल्हा परिषद सभापती दिलीप बाफना, उद्योजक लखीचंद बाफना, उद्योजक अशोक शिंगवी, उद्योजक महेश नगरे, उद्योजक गौतम बाफना, उद्योजक यश बाफना, बाळासाहेब नवसरे, कृष्णराव चौहान, परशुराम भांगे, दत्तात्रय जगताप व बाफना परिवार सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here