Sunday, March 29, 2026
Home ताज्या बातम्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी जामखेड तालुक्यातील कासार...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी जामखेड तालुक्यातील कासार समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

0
226

जामखेड न्युज——

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी जामखेड तालुक्यातील कासार समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

नांदेड जिल्ह्य़ातील मुदखेड येथील कासार समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अन्यायाबद्दल व घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज १७ जुलै २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील संपूर्ण कासार समाजाच्या वतीने निषेध करुन आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नांदेड जिल्ह्य़ातील मुदखेड तालुक्यातील निवघा येथे राहणाऱ्या कासार समाजातील अल्पवयीन मुलगी वय वर्षे १७ हिचा गावातील गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या यांने मागील वर्षभरात अनेक वेळा छेडछाड करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच वेळोवेळी लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केली. अखेरीस या सर्व छळाला व त्रासाला कंटाळून या मुलीने दि १२ जुलै २०२३ रोजी विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.

या आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या गाव गुंडाला वेळोवेळी समज देऊनही तो कायम या अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. त्याने या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या या आरोपीवर पोक्सो ( बाल लैंगिक अत्याचार ) अंतर्गत गुन्हा दाखल करावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील कासार समाजातर्फे करण्यात येत आहे.

घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठीचे निवेदन जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले. यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की जामखेड च्या कासार समाजाच्या वतीने मला निवेदनाद्वारे केलेल्या मागणी नुसार मुदखेड येथे घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे . ज्या आरोपींनी हे कृत्य केले आहे त्या आरोपींवर शासनाने कठोर कारवाई तसेच शासनाला प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कासार समाज्याची मागणी पाठवली जाईल आसे अश्वासन जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड येथील कासार समाज्याला दिले .यावेळी कासार समाजाचे जामखेड तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणी व कासार समाजातील सर्व समाज बांधव, महिला मुली व मुले बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!