खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जामखेड पोलिसांकडून जेरबंद शहरात आश्रयास असलेल्या गुन्हेगारांची पोलीसांना माहिती द्यावी – पोलीस निरीक्षक महेश पाटील

0
170

जामखेड न्युज——

खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जामखेड पोलिसांकडून जेरबंद

शहरात आश्रयास असलेल्या गुन्हेगारांची पोलीसांना माहिती द्यावी – पोलीस निरीक्षक महेश पाटील

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भुम व शिराढोण पोलीसांना हवे असलेले खुनाच्या गुन्हयातील दोन फरार आरोपी जामखेड शहरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून त्यांना आवश्यक त्यासुचना देऊन कामगिरीवर पाठवले.

त्यानुसार यापथकाने जामखेड शहरातील मिलिंदनगर व कर्जत रोड या ठिकाणी छापे टाकून भुम पोलीस स्टेशनच्या गुन्हा रजिस्टर नंबर 181/2023 भा.द.वि कलम 302, 34 गुन्ह्यातील महिला आरोपी सुशमिना ईदप्पा ऊर्फ विदुषक काळे वय २५ रा. सासुबाईचा माळ ता. भुम. हल्ली मुक्काम मिलिंदनगर जामखेड हिस तसेच पोलीस स्टेशन शिराढोण गु. र. नंबर 143/2020 भादवी 302 गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी संजय रमेश काळे, रा. कर्जत रोड, जामखेड यांना ताब्यात घेऊन उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार व त्यांचे पथक यापथकाडे पुढील कारवाईसाठी सपुर्द केले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे, काॅन्स्टेबल पालवे, पळसे, बेलेकर, महिला पोलीस काॅन्स्टेबल सपना शिंदे यांनी केली.

चौकट
जामखेड शहर हे पुर्वीपासूनच शेजारच्या काही जिल्ह्यातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेले आहे. यापुर्वी राज्यापरराज्यातील गुन्हेगार पकडून संबंधित पोलीसांकडे सपुर्द करण्यात आले आहेत. मात्र यापुढे असे चालणार नाही. शहरात आश्रयास असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेतला जाणार असून नागरिकांनीही असे गुन्हेगार माहित असतील तर पोलीस प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. माहिती देणारांचे नाव गुप्त ठेवले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here