जामखेड न्युज——
सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या तर्फे धाकटी पंढरी येथे जाण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवा
आषाढी एकादशी निमित्त अनेक लोकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते लोक धनेगाव धाकटी पंढरी येथे जातात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेक महिला व ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय होते हि अडचण लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी खर्डा ते धनेगाव मोफत बसची सोय केली आहे.
दिनांक 29 जून रोजी गुरुवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आषाढी एकादशी निमित्त धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत दोन लक्झरी बसची सेवा प्रा. सचिन सर गायवळ त्यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा.
याबाबत माहिती अशी की, हिंदू समाजासाठी पवित्र असणाऱ्या आषाढी एकादशीला पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी व भाविक भक्त दर्शनासाठी गेले आहेत, परंतु प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी खर्डा व परिसरात सहीत अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड या जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी धनेगाव येथे येत असतात.
खर्डा शहरातून धनेगाव येथे जाण्यासाठी भाविकांचा ओघ दरवर्षी मोठ्या प्रमाणात असतो एसटी बस व खाजगी गाड्या जास्तीच्या उपलब्ध नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो याचेच गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ यांनी भाविकांना दर्शनासाठी खर्डा ते धनेगाव अशा दोन अशा लक्झरी बस मोफत प्रवासासाठी उपलब्ध केल्या आहेत, त्याचबरोबर ज्या भाविकांनी दर्शन घेतले आहे त्यांनी परत खर्डा येथे येण्यासाठी पुन्हा त्याच मोफत बसची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे, तरी दिनांक 29 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धाकटी पंढरी धनेगाव येथे दर्शनासाठी दोन लक्झरी बस मोफत ठेवण्यात आले आहेत तरी भाविक भक्तांनी या मोफत बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. सचिन सर गायवळ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.