जामखेड न्युज——
साकत घाटात दुधाचा टँकर पलटी, पाच हजार लीटर दुध सांडले
बारामती येथील दुधाचा टँकर साकत परिसरातील दुध गोळा करून रात्री २.३० च्या सुमारास साकत घाटात वळणावर टँकरला वळण न बसल्याने पलटी झाली यातील निम्मे दुध सांडले सुदैवाने चालकाचे प्राण वाचले. अरूंद घाटामुळे अनेक दुर्घटना होत आहेत. घाट रूंदीकरण करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. काम खुपच संत गतीने सुरू आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे आहेत यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात. अनेक वेळा मोठ्या गाड्यांना घाटात वळण बसत नाही यामुळे दुर्घटना घडत आहेत.
दि. २५ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास बारामती येथील श्रेइबर डायनॅमिक्स कंपनीचा दुधाचा टँकर एम एच 42 टि 0954 हा दुधाचा टँकर परिसरातील तसेच पाटोदा तालुक्यातील दुधाचे कलेक्शन करून डायनॅमिक्स डेअरी बारामती येथे चाललेला होता. रात्री घाटात वळणाचा अंदाज न आल्याने तसेच वळण न बसल्याने दुधाच्या टँकरची पलटी झाली आहे. सुदैवाने चालक वाचला पण टँकर मधील जवळपास निम्मे दुध सांडले तर निम्मे दुध सकाळी दुसऱ्या वाहनात भरून नेले.
साकत घाटाचे रूंदीकरण करावे
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. काम खुपच संत गतीने सुरू आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे आहेत यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात. अनेक वेळा मोठ्या गाड्यांना घाटात वळण बसत नाही यामुळे दुर्घटना घडत आहेत. यामुळे साकत घाटाचे रूंदीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.