जामखेड न्युज——
गायञी बारगजेला जिल्हा तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर जिल्हा तायक्वांदो स्पर्धेत जामखेड येथील गायत्री बारगजे हिने सुवर्णपदक जिंकले आहे. रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने रत्नागिरी येथे 24 ते 26 जून दरम्यान 33 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत करिता अहमदनगर जिल्ह्याचा संघ नुकताच जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने सैनिकी विद्यालय लोणी ता. राहता येथे रविवारी ज्युनिअर व कॅडेट जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जामखेडच्या गायत्री संतोष बारगजे ने सुवर्णपदक जिंकून रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचबरोबर कॅडेट जिल्हास्तरीय स्पर्धेत जामखेडच्या आदर्श आदर्श समिंदर व नसीमा पठाण यांना रोप्य पदक तर सिद्धी सांगळे हिने कांस्यपदक पटकावले आहे. कमी कालावधीत सराव करून या तिन्ही खेळाडूंनी चांगले खेळ प्रदर्शन करून पदकांची कमाई केली असल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. जामखेडच्या हे सर्व खेळाडू अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक संतोष बारगजे यांच्याकडे जामखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील प्रांगणात नियमित सराव करत आहेत.
या सर्व खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे उपाध्यक्ष किरण बांगर सहसचिव अल्ताफ कडकाले, रवींद्र शिर्के, सादिक शेख, देवेंद्र बारगजे, सौ सुरेखा मुंडे, संजय बेरड, दत्तात्रय उदारे सर यांनी अभिनंदन केले आहे