दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रा. सुनील नरके तर सचिव पदी भरत लहाने यांची बिनविरोध निवड

0
210

जामखेड न्युज——

दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रा. सुनील नरके तर सचिव पदी भरत लहाने यांची बिनविरोध निवड

दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था, जामखेड या संस्थेच्या चेअरमन पदी प्रा. सुनिल नरके, व्हाईस चेअरमन उमाकांत कुलकर्णी तर सचिव पदी भरत लहाने व सहसचिव पदी प्रा. गौतम केळकर तर खजिनदार पदी तर खजिनदार पदी बाबासाहेब धनवडे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. याबाबत यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

२०२३ – २०२८ साठी पुढील प्रमाणे संचालक मंडळ

प्रा. नरके सुनील, देडे अनिल, सुरवसे दिपक, कुलकर्णी उमाकांत, लहाने भरत, वराट हनुमंत, रासकर अर्जुन, सरडे जयश्री, डोंगरे दिपीका, धनवडे बाबासाहेब, केळकर गौतम अशा अकरा जणांच्या संचालक म्हणून बिनविरोध निवडी झाल्या होत्या यानुसार गुरूवार दि. १८ रोजी पदाधिकारी निवडी बिनविरोध संपन्न झाल्या.

दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेतेची स्थापना १९९८ साली करण्यात आली आहे. एक अपवाद वगळता आतापर्यंत सर्व निवडणूका या बिनविरोध झालेल्या आहेत. बिनविरोधची परंपरा या वेळीही कायम राहिली तसेच चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, सहसचिव खजिनदार या निवडीही बिनविरोध संपन्न झाल्या याबाबत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निवडीबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे संचालक सैफुल्ला खान यांच्या सर्व संचालक मंडळ, प्रा. मधुकर राळेभात, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक बी. ए. पारखे, पर्यवेक्षक पी. टी. गायकवाड, भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश अडसूळ, श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे, न्यू इंग्लिश स्कूल राजुरीचे मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांच्या सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, मित्रमंडळी व नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here