जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील पोलीस निरीक्षकाचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस महासंचालकाकडून सन्मान
जामखेड तालुक्याचे सुपुत्र पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांना पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. यामुळे लोहकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 34 पोलीस अधिकाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र बुधवारी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी जाहीर केले, यामध्ये जामखेड तालुक्यातील वाकी गावचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांचाही या सन्मानात समावेश झाला आहे.
लोहकरे सध्या पोलीस निरीक्षक म्हणून वैजापूर पोलीस स्टेशन औरंगाबाद ग्रामीण या पदावर सध्या काम करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत पोलीस खात्यात नोकरी करीत असताना प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून अनेक गुन्हेगारीचा तपास यशस्वीपणे केला आहे. त्यांनी नेहमीच पोलीस खात्याचे नाव उंचावण्याचे काम केले आहे.त्यामुळे त्यांना पोलीस महासंचालकां कडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन लवकरच गौरविण्यात येणार आहे.
या सन्मानचिन्ह व प्रशिस्तीपत्रामुळे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यावर जामखेड तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.