जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे अचानक वादळ व झालेल्या पावसात विज पडून भिमराव बाजीराव दगडे (वय ६५ वर्षे) दिघोळ, या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे आज दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास अचानक वादळ व गारांचा पाऊस सुरू झाला. दरम्यान काही समजण्याच्या आतच आपल्या गट नंबर २३ मधील शेतातील गुरांना चारा कापत असलेल्या ६५ वर्षीय शेतकरी भिमराव बाजीराव दगडे रा. दिघोळ यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
ही घटना समजताच दिघोळचे सरपंच नानासाहेब गिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सदर ठिकाण जाऊन मयत भिमराव बाजीराव दगडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे.
तर महसूल विभागाच्या वतीने सदर घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे