जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून “परिवर्तन पर्व एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प” अंतर्गत कोल्हेवाडी येथे जलसंधारण कामाची सुरुवात

आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था च्या माध्यमातून परिवर्तन पर्व एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प अंतर्गत जामखेड तालुक्यातील साकत गट ग्रामपंचाय मध्ये येणाऱ्या कोल्हेवाडी येथे सकाळ रिलीफ फंड, नाम फौंडेशन व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून नाला खोलीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे, नाला बंडिंग गाळ काढणे व खोलीकरण, डीप सी. सी. टी. या जल संधारण कामांचा प्रारंभ करण्यात आला.

गावातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांच्या हस्ते मशीनचे पूजन करण्यात आले, यावेळी गावाचे सरपंच हनुमंत पाटील, राष्ट्रवादी युवा नेते सागर कोल्हे , संग्राम कोल्हे, ग्रामपंचाययत सदस्य वाल्मिक कोल्हे, राजाभाऊ कोल्हे, शेतकरी बबन कोल्हे, अर्जुन कोल्हे, लक्ष्मण कोल्हे, राजाभाऊ कोल्हे, दत्तू कोल्हे, राम साईनाथ कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन भगवान कोल्हे, महादेव कोल्हे यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जलसंधारणच्या कामास सुरुवात करण्यात आली.

नाम फौंडेशन व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून नाला खोलीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे, नाला बंडिंग गाळ काढणे व खोलीकरण, डीप सी. सी. टी. या जल संधारण कामांमुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. याचबरोबर अनेक फायदे ग्रामस्थांना मिळतील पाझर तलावातील गाळ काढण्याने पाणी साठा वाढेल तसेच हा गाळ जमिनीत टाकल्यामुळे चांगली जमीन तयार होईल. या कामाचा फायदा ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




