जामखेड न्युज——
कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व आमदार रोहित (दादा) पवारांकडेच – संजय वराट
श्री साकेश्वर विद्यालयातील १०४ गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
आमदार रोहित पवार यांच्या सायकल वाटपामुळे विद्यार्थ्यांची वेळेची बचत तर होणारच आहे याचबरोबर सायकल चालवल्यामुळे शारीरिक कसरत होऊन तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व आमदार रोहित (दादा) पवारांकडेच आहे. आपल्या कर्तृत्वावर मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना चाॅकलेट, कंपास बाँक्स, रायटिंग पँड व आता सायकल वाटप करत दातृत्व दाखवले आहे असे मत संजय वराट यांनी सायकल वाटप प्रसंगी व्यक्त केले.
आमदार रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत जामखेड तालुक्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले यानुसार आज श्री साकेश्वर विद्यालयात १०४ गरजू विद्यार्थ्यांना प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, सेवा संस्थेचे संचालक पोपट वराट, नानासाहेब लहाने, पोलीस पाटील महादेव वराट, गणेश वराट, दादासाहेब वराट, बाळासाहेब वराट, ज्ञानदेव मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल वराट, महादेव वराट, अजित वराट, भरत वराट (फौजी), निशिकांत वराट, केशव वराट, भरत लहाने, राधे मुरूमकर, राजाभाऊ वराट, सुदाम वराट,
युवराज मोहिते, गोरख वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे, सुदाम वराट यांच्या सह अनेक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय वराट म्हणाले की, आमदार रोहित दादा पवारांच्या माध्यमातून मिळालेल्या सायकलची नीट काळजी घ्या पुढे हीच सायकल आपला भाऊ बहिण वापरणार आहेत. पुढील टप्प्यात राहिलेल्या गरजू सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सायकल मिळेल असे सांगितले.
विद्यार्थ्यांमधून ओम वराट व लक्ष्मी वराट यांनी आपल्या मनोगतात सायकल मिळाल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचे खुप खुप आभार मानले.
सायकल मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता