वैशाली फर्निचरने उत्कृष्ट सेवेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला – अमित चिंतामणी
जामखेड शहरातील प्रसिद्ध वैशाली फर्निचर या दुकानात फेस्टिवल आँफर मध्ये ५ आँक्टोबर ते २२मार्च पर्यंत ९९९९च्या इलेक्ट्रॉनिक व फर्निचर खरेदीवर लकी ड्राँ आँफर कुपन आयोजित केली होती. आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली यात पहिले बंपर बक्षीस हिरो होंडा एचएफ डिलक्सचे भाग्यवान विजेते फक्राबाद येथील मधुकर वाघमारे हे ठरले त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य लकी ड्राँ आँफर काढण्यात आली यावेळी जामखेड नगरपरिषदेचे कार्यक्षम नगरसेवक अमित चिंतामणी, उद्योगपती आकाश बाफना, प्रसिद्ध व्यापारी सुनील उगले, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, वैशाली फर्निचरचे संचालकसंपत बोरा, शुभम बोरा, याचबरोबर संदेश कोठारी, भुषण बोरा, निलेश पारख, निखिल बोथरा, अतुल कदम यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
५ आँक्टोबर घटस्थापनेच्या दिवसांपासून ते आज२२ मार्च गुढीपाडवा या कालावधीत ९९९९ रूपयांच्या खरेदीवर ५१ बक्षिसे ठेवण्यात आली होती. एकुण ५०० कुपन मधुन ५१ बक्षिसे काढण्यात आले. यात प्रथम क्रमांकाचे बक्षिस हिरो होंडा कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकलचे भाग्यवान विजेते फक्राबाद येथील मधुकर वाघमारे ठरले एक लहान मुलीच्या हस्ते चिट्टी काढण्यात आली.
दुसरे बक्षीस फ्रिज होते याचे भाग्यवान विजेते मुकदा गडगुले हे ठरले.
तिसरे बक्षीस एलईडी टि वव्ही होती ती अनिल शिंदे या भाग्यवान विजेत्याची चिट्टी निघाली.
चोथे बक्षीस वाँशिंग मशीन होते त्याचे भाग्यवान विजेते राजेश राम काळे ठरले
पाचवे बक्षीस मिक्सरचे चार बक्षिसे होती याचे भाग्यवान विजेते – ओंकार वाकळे, इस्माईल तांबोळी, भाग्यश्री भांडवलकर ठरले
याच बरोबर सहावे बक्षीस कुकर आठ नग, सातवे ट्रॅव्हल बँग आठ नग, आठवे बक्षीस सिलिंग फँन चार नग, नववे बक्षीस माँब चार नग, दहावे बक्षीस गॅस शेगडी तीन नग, अकरावे बक्षीस टी पाँय दहा नग, बारावे बक्षीस इस्त्री सहा नग असे एकूण ५१ बक्षिसे ठेवण्यात आली होती. याचा आज लकी ड्राँ काढण्यात आला यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित चिंतामणी यांनी सांगितले की, वैशाली फर्निचरचे संचालक बोरा पितापुत्राने ग्राहकांना चांगली सेवा देत विश्वास संपादन केला आहे यामुळे लकी ड्राँ साठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी बोलताना उद्योजक आकाश बाफना म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक व फर्निचर क्षेत्रात ग्राहकांना जे जे हवे ते वैशाली फर्निचरमध्ये उपलब्ध असते. तसेच गुणवत्तेच्या जोरदार परिसरात आपला लौकिक वाढवला आहे.
यावेळी बोलताना जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट म्हणाले की, उच्च दर्जा व माफक किंमत यामुळे अल्पावधीतच वैशाली फर्निचरचे ग्राहकांच्या मनात घर केले आहे.
लकी ड्राँ सर्व लोकांसमोर पारदर्शक पणे सर्व चिट्या काढून मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले. पुढील वर्षीही आणखी भव्य दिव्य लकी ड्राँ काढण्यात येणार असल्याचे बोरा यांनी सांगितले.