जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील खर्डा घोडेगाव व पिंपळगाव आळवा परिसरात झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानसंपामुळे पंचनामे करण्यासाठी अडचण
जामखेड तालुक्यातील खर्डा, घोडेगाव व पिंपळगाव आळवा परिसरात शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली यामुळे काढून ठेवलेल्या व उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने नुकसानीची पहाणी करण्यासाठी कर्मचारी पाठवले आहेत. सध्या अनेक कर्मचारी जुन्या पेन्शन साठी संपावर असलेल्याने पहाणी करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिके काढणीसाठी तयार झालेली आहेत ज्वारी, गहू, हरभरा काही प्रमाणात काढलेले आहेत तर काही शेतात उभे आहेत. काल सायंकाळी झालेल्या गारपिटीने उभ्या व काढून ठेवलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, द्राक्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कर्मचारी वर्ग संपावर आहेत. त्यामुळे नुकसाची पहाणी किंवा पंचनामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तरीही तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पंचनामे पाहणी करण्यासाठी खर्डा, घोडेगाव, पिंपळगाव आळवा परिसरात पाठवले आहे.
चौकट
सरकारने ताबडतोब संपावर तोडगा काढावा म्हणजे
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करता येतील तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी संपामुळे रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तसेच सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर संप मिटवावा अशी मागणी नागरिक करत आहेत.