महिलांनी स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे – पोलीस निरीक्षक महेश पाटील निवारा बालगृहात महिला दिन साजरा

0
285

जामखेड न्युज——

महिलांनी स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे – पोलीस निरीक्षक महेश पाटील

निवारा बालगृहात महिला दिन साजरा

महिलांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे, असे प्रतिपादन जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.

ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचालित निवारा बालगृह आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. समता भूमी, मोहा फाटा, बीड रोड, जामखेड येथील निवारा बालगृहाच्या सभागृहात ह. भ. प. कांताताई सोनटक्के महाराज, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास वीज महावितरण उप अभियंता मा.योगेश कासलीवाल ,मोहा गावचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, संस्थेचे सल्लागार मा.अरुण डोळस तरडगाव मा. सरपंच संगीता केसकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे शाल, श्रीफळ, व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

जागतीक महिला दिनानिमित्त ग्रामीण विकास केंद्र व ॲक्शन ऍड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात मयत झालेल्या कुटुंबांना तसेच विधवा, परीतक्ता महिलांना उपजिविकेसाठी शिलाई मिशिन व पिठाची गिरण या वस्तूंचे वाटप जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलतांना ह.भ.प. कांताताई सोनटक्के म्हणाल्या की, माता जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, संत मिराबाई, संत जनाबाई यासारख्या महिलांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले त्यामुळेच आम्हाला हक्काचे व्यासपीठ मिळते. ग्रामपंचायत सदस्यांपासून राष्ट्रपती पदापर्यंत सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. आणि यापुढेही राहतील त्यासाठी महिलांनी खूप शिकावे मोठे व्हावे व पुढे जावे.

योगेश कासलीवाल म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला मोठ्या धाडसाने काम करीत आहे. व त्यांनी आपले कर्तृत्व विविध क्षेत्रात सिद्ध केले आहे. मुलगा हा वंशाचा दिवा असला तरीही मुलगी ही वंशाची पणती आहे. आणि ती दोन्ही घरी उजेड देण्याचे काम करते.

ॲड.डॉ. अरुण जाधव म्हणाले की, सर्व महापुरुषांना घडविण्यात त्याच्या माता भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळेच आज महिलांना मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. आगामी काळात समाज परिवर्तनाचे काम करणारे व्यक्ती आणि विचारांसोबत राहून गोर गरीब कष्टकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या विचारांचा गाडा पुढे नेण्यासाठी समाजातील रणरागिनींनी सज्ज व्हावे. व महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा नायनाट करावा.

यावेळी ग्रामसेवक प्रशांत सातपुते, सुरेखा ताई चव्हाण, यांचीही भाषणे झाली. संस्थेचे संचालक बापु ओहोळ यांनी प्रास्ताविकेत बोलताना जागतिक महिला दिनाच्या निमित्त संस्थेच्या वतीने मोहा परिसरातील महिलांसाठी कंपनीच्या माध्यमातून स्वावलंबी योजनेच्या अंतर्गत त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला जाईल व त्यांच्या उपजीविकेचे साधन संस्थेच्या मार्फत सोडवले जाईल असे आव्हान करून मोहा, रेडेवाडी, नाणेवाडी, हापटेवाडी या चार गावांना पुढील भविष्यामध्ये संस्थेने दत्तक म्हणून घेतलेले अशी मोठी घोषणा त्यांनी केली.

संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती सांगळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास भिमराव चव्हाण, सुरेश शेगर , सुरेश शिंदे,आकाश शेगर अजिनाथ शिंदे, मोहन शिंदे, मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, ऋषिकेश गायकवाड, तुकाराम शिंदे,राजू शिंदे,संतोष चव्हाण सोनेगाव, स्मिता मोहिते, पायल मुळेकर, छाया मोरे, आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here