जामखेड न्युज——
जामखेडमध्ये संत तुकाराम महाराज बीजोत्सवा निमित्त श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव व श्रीमद् जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा (बीजोत्सव) श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव (तिथीनुसार), गाथा पारायण, अखंड हरिनाम सप्ताह फाल्गुन शु. ११ शुक्रवार दि. ३/३/२०२३ ते फाल्गुन कृ. ४ शुक्रवार दि. १०/३/२०२३ पर्यंत आयोजित केला आहे. या सप्ताहामध्ये निष्ठावंत वारकरी ज्ञानी महापुरूषांची कितने आयोजिली आहेत. तरी भाविकांनी श्रवण सुखाचा व पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जामखेड येथील श्रीविठ्ठल मंदिर येथे सालाबाद प्रमाणे होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे हे ३६ वे वर्षे असून हा सप्ताह शुक्रवार दि. ३/३/२०२३ ते शुक्रवार दि. १०/३/२०२३ दरम्यान पार पडणार आहे. तर शुक्रवार दि. १०/३/२०२३ सकाळी १० ते १२ ह.भ.प.भरत महाराज पाटील (जळगांव) यांचे काल्याचे नंतर श्री. दिलीपशेठ बाफना आणि सहपरिवार यांच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या हप्ताहा दरम्यान ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवने (जामखेड) ह.भ.प. माणिकबुवा मोरे महाराज (जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज, देहू), ह.भ.प.गणेश महाराज कार्ले (पुणे), ह.भ.प.दत्ता महाराज अंबीरकर (डिकसळ), ह.भ.प. विश्वनाथ महाराज नन्नवरे (अरणगाव), ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले अध्यक्ष, अ.भा. वा. मंडळ, महाराष्ट्र, ह.भ.प. मुकुंद (काका) जाटदेवळेकरांचे (यांच्या किर्तनानंतर पुष्पवृष्टी) .ह.भ.प.भरत महाराज पाटील जळगावयांची कीर्तने होणार आहेत. तर या सप्ताहामध्ये संत सेवेचे यजमान आर. एन. ज्वेलर्स, अॅड. श्री. हर्षल डोके, श्री. महेश विठ्ठलराव राऊत, श्री. अभिमन्यु पवार, श्री. सुंदरदास बिरंगळ, श्री. आनंद राजगुरू, श्री. सुभाष थोरात पोपट राळेभात हे आहेत.
गुरुवार दि. ९/३/२०२३ रोजी दुपारी ४ ते ७ श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, श्रीमद् | जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती श्री शिवाजी महाराज भव्य मिरवणूक निघणार आहे तरी आपण या सांस्कृतिक मिरवणुकीमध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.