जामखेड न्युज——
जैन धर्माचे मुळ तत्व ख-या अर्थाने आचरणात आणणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी – राजेंद्र पवार
जगा आणि जगु द्या. हे जैन धर्माचे मुळ तत्व ख-या अर्थाने आचरणात आणत सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य वाखणण्याजोगे असल्याचे गौरोदगार बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी काढले.
श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन काॅन्फरन्स ,पुणे येथील संचेती हाॅस्पीटल आणि जामखेड येथील समर्थ हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महावीर भवन मध्ये मोफत अस्थीविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राजेंद्र पवार बोलत होते.
यावेळी संचेती हाॅस्पीटलचे प्रसिध्द मणकेविकार तज्ञ डाॅ.अजय कोठारी,आ निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके ,राहुल शिंगवी, उद्योजक आनंद कोठारी, सारडा काॅलेजचे अध्यक्ष सुमतीलाल कोठारी ,विशाल शेठीया, नंदकुमार भटेवरा, चंद्रकांत रुणवाल, मनसुखलाल गुगळे , उद्योजक शांतीलाल गुगळे , हेमंत पोखरणा वैद्यकिय अधिकारी डाॅ.युवराज खराडे ,डॉ. भरत दारकुंडे, , डॉ. सुरेश काशीद , कांतीलाल कोठारी , राजेंद्र बलदोटा, विजय डोंगरे, कांतीलाल चानोदिया ,महावीर बोरा, प्रफुल्ल सोळंकी, संजय नहार, सुभाष भळगट, आनंद कोटेचा ,संतोष भनगडे, संजय टेकाळे, सचिन गाडे, समाधान कोंडलकर, दिपक भोरे,रोहिदास केकान, श्रेणिक खाटेर,अमोल तातेड, डॉ. रमेश कोठारी, विजय कोठारी ,अमृतलाल कोठारी, तेजस कोठारी, हर्षल कोठारी, समाधान कोंडलकर, सचिन गाडे, विजय कोठारी, राजेश गांधी, राहुल राकेचा, मनोज कुलथे, निलेश तवटे, गौरव अरोरा, वैभव कटारिया, प्रशांत मोराळे, प्रभुलिंग धुमाळ , राधाकिसन गोरे, नामदेव भोसले,गहिनीनाथ लोखंडे ,दहिफळे सर, बाबूसेठ भंडारी, वालचंद जैन, शोभाचंद ललवाणी, भंडारी सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसिध्द मणकेविकारतज्ञ डाॅ. अजय कोठारी म्हणाले, माणसाला पैसा गरजेचा आहे. मात्र त्यापेक्षा जास्त प्रतिष्ठा महत्वाची आहे आणि ही प्रतिष्ठा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी कमवली आहे.त्यांच्या कार्यापासून मी प्रेरणा घेतल्याचे डाॅ.कोठारी यांनी सांगितले.वयाची ६० वर्ष पुर्ण झाल्यानंतरही सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा उत्साह २५ वर्षाच्या तरूणासारखा आहे.
यावेळी राणीताई लंके, डाॅ.युवराज खराडे, आनंद कोठारी यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रफुल्ल सोळंकी यांनी केले. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी, तर आभार कांतीलाल कोठारी यांनी मानले.
चौकट –
२७० रूग्णांची तपासणी मोफत अस्थिविकार शिबीरात तब्बल २७० रूग्णांची तपासणी करून, या रूग्णांना मोफत औषधे देण्यात आली. तर अनेक रूग्णांची अत्याधूनिक मशीनव्दारे मोफत बी एम डी (हाडांंची ठिसुळता) तपासणी करण्यात आली.